विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:29+5:302021-05-23T04:34:29+5:30
बुलडाणा : विविध प्रलंबित मागण्या शासनाकडून पूर्ण न झाल्यास आंदाेलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र माध्यमिक डी.एड.शिक्षक महासंघाच्या केंद्रीय ...
बुलडाणा : विविध प्रलंबित मागण्या शासनाकडून पूर्ण न झाल्यास आंदाेलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र माध्यमिक डी.एड.शिक्षक महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला़ ही बैठक २० मे राेजी ऑनलाइन पार पडली़ अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे हाेते़
बैठकीमध्ये संघटनेचे मार्गदर्शक संजय देशमुख व दिनेश कुटे उपस्थित होते. महाराष्ट्र खासगी शाळा (कर्मचारी सेवेच्या शर्ती) १९८१ नुसार शालेय प्रशासन चालत असून गेल्या चाळीस वर्षांपासून माध्यमिक शिक्षकांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचा निषेध करण्यात आला़ तसेच अधिसूचना ८ जून २०२० प्रमाणे अंमलबजावणी त्वरित होत नसेल तर कोरोनाचे सर्व नियम पाळून आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या अध्यक्ष पद्मा तायडे यांनी जाहीर केला. महासचिव बाळा आगलावे यांनी संचालन करून पदवीधर डी.एड शिक्षकांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. ८ जून २०२० ला अधिसूचना प्रसारित करून या शिक्षकांना आशेचा किरण दाखवला असला तरी अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेला आंदोलनाशिवाय मार्ग नाही,असे मत कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी व्यक्त केले. उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे, बंडू धोटे, राजेंद्र मसराम यांनीही आपले मत व्यक्त केले. कोषाध्यक्ष शहाबत हुसैन, विभागीय सचिव लक्ष्मण राठोड, काळूराम धनगर, जांभुळे सर व इतर उपस्थित सदस्यांनी आंदेालनाला पाठिंबा दिला़