महाराष्ट्र शिक्षक आघाडी क्रिकेट चषकाचे उद्घाटन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:55+5:302021-02-17T04:40:55+5:30
महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे तथा राजमाता जिजाई महिला अर्बन चिखलीच्या अध्यक्ष प्रा. डॉ. मीनल ...
महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे तथा राजमाता जिजाई महिला अर्बन चिखलीच्या अध्यक्ष प्रा. डॉ. मीनल गावंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला डॉ. नीलेश गावंडे, डॉ.मिनल गावंडे, पांडुरंग पाटील खेडेकर, कुणाल बोंद्रे, रवींद्रप्रसाद हरलालका, नगरसेवक प्रा.डॉ.राजू गवई, रफीक कुरेशी, प्रकाश शिंगणे, मो.आसिफ, दत्ता सुसर, सुरेशआप्पा बोंद्रे, उबेदअली खान, प्रशांत एकडे, अमीन कुरेशी, आशिष लढ्ढा, सलीम मन्यार, प्रा.सुभाष शेळके, समाधान बंगाळे, प्रा.अनंत काकडे, प्रा. दिलीप उन्हाळे, प्रा. संजय चिंचोले, महेश महाजन, नंदू कऱ्हाडे, डॉ. योगेश काळे, हाजी दादुसेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, खेळामध्ये हार जीत सुरू असते, त्यामुळे निराश न होता आपल्या संघासाठी प्रत्येकाने आपले १०० टक्के योगदान द्यावे, असे आवाहन केले. या स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार ११ रूपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार असून व्दितीय पारितोषिक ५५ हजार ५५५ रूपयांचे आहे. तसेच सर्व सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत असून मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर व बेस्ट बॅटसमनला प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत १६ संघांनी नाव नोंदणी केली असून यातील ८ संघ हे जिल्ह्याबाहेरील आहेत. उद्घाटनाचा सामना सौरभस्टार ११ बुलडाणा व स्टार ११ किन्होळा या दोन संघादरम्यान खेळविला गेला.