वीज चोरांविरुद्ध महावितरणच्या आकस्मिक धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:13 PM2017-09-29T20:13:49+5:302017-09-29T20:14:25+5:30

Mahavitaran's accidental raid against power thieves | वीज चोरांविरुद्ध महावितरणच्या आकस्मिक धाडी

वीज चोरांविरुद्ध महावितरणच्या आकस्मिक धाडी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील सात शहरांमध्ये ८२ ठिकाणी कारवाईजवळपास ११ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने ठोस पाऊले उचलत जिल्ह्यातील सात शहरांमध्ये एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. या मोहिमेमध्ये एकूण ८२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये ८३ हजार ४४१ वीजयुनिटची म्हणजे जवळपास ११ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
आरएपीडीआरपी योजनेमध्ये जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व नांदुरा यांचा समावेश आहे, या शहरात दजेर्दार व सर्वोत्तम वीज सेवा देण्यासाठी विविध कामे सुरु आहे. यासोबतच वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. वीज चोरीला अटकाव घालण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार  अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये, पी एल.हेलोडे, अधिकारी व जनमित्र अशा ३७ पथकामध्ये जवळपास २५१ जणांचा समावेश आहे. यामध्ये  सातही शहरातील  आढळलेल्या एकूण ५८ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसºया कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्या एकूण २४ जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यात नुकत्याच वीजचोरी विरुद्ध झालेल्या  कारवायांमध्ये २०४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. 
वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित आहे. यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणच्या बुलडाणा मंडळाचे अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी केले आहे.

Web Title: Mahavitaran's accidental raid against power thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.