बाप्पाच्या स्वागतासाठी महावितरणच्या पायघड्या! गणेश मंडळासाठी कमी दरात वीज पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 05:35 PM2018-08-26T17:35:54+5:302018-08-26T17:40:43+5:30
बुलडाणा : राज्यातील गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे. त्यात महावितरण कंपनीने पुढकार घेत गणेश मंडळांना कमी दरात वीज उपलब्ध करून बाप्पाच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : राज्यातील गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे. त्यात महावितरण कंपनीने पुढकार घेत गणेश मंडळांना कमी दरात वीज उपलब्ध करून बाप्पाच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या आहेत. गणेश मंडळासाठी वीज आकारणी तीन रुपये २० पैसे व वहन आकारणी एक रुपया १८ पैसे असा प्रतियुनिट चार रुपये ३८ पैशांनी वीज पुरवठा केला जाणार आहे. १३ सप्टेंबरपासून सुरू होणाºया गणेशोत्सवासाठी सार्वजनीक गणेश मंडळांनी आपली तयारी सुरू केली आहे. देखावे, लाईटींग यासारख्या झगमगाटासाठी गणेश मंडळामध्ये एकप्रकारची स्पर्धा लागते. त्यामुळे दुरपर्यंत गणेश मंडळाकडून लाईटींग व लाईट लावले जातात. त्याकरिता लागणारा विद्युत पुरवठा काही मंडळाकडून अनधिकृतपणे वापरल्या जातो. गणेशोत्सव मंडळांकडून होणारी वीजचोरी आणि त्यामुळे होणारा शॉटसर्कीटचा धोका, अशा प्रकारची हाणी टाळण्यासाठी महावितरण कंपनी सरसावल्याचे दिसून येत आहे. मंडप, रोषणाई आणि देखाव्यांसाठी लागणारी विद्युत सार्वजनीक गणेश मंडळाने अधिकृतपणेच घ्यावी, यासाठी महावितरणकडून सवलतीच्या दरात वीज जोडणी देण्यात येणार आहे. सार्वजनीक उत्सवांकरीता तात्पुरती वीजजोड देण्यासाठी वहन आकारासह प्रतियुनिट ४ रुपये ३८ पैशांची आकारणी करण्यात येणार आहे. घरघुती व व्यावसायीक वीज दरापेक्षा हा दर कमी आहे. व्यावसायीक दरापेक्षा सार्वजनीक गणेश मंडळासाठी २ रुपये ९ पैशांनी दर कमी करण्यात आला आहे. सार्वजनीक मंडळासाठी कमी दरात वीज पुरवठा केला जाणार असल्याने मंडळांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने तात्पुरता अधिकृत वीज जोड घ्यावा, यासाठी महावितरणकडून विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
प्रत्येक कार्यालयात विशेष व्यवस्था
बºयाचवेळा नविन विद्युत मिटर बसविण्यासाठी ग्राहकांना महावितरण कार्यालयात वारंवार चकरा मारावा लागतात. अनेक वेळा मिटर उपलब्ध नसतात, त्यामुळे अडचणी येतात. परंतू सार्वजनीक गणेशोत्सव मंडळासाठी अधिकृत विद्युत देण्याकरीता महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मंडळाकडून विद्युत पुरवठ्याची मागणी करताच तातडीने त्यांच्यासाठी विद्युतची व्यवस्था करून देण्यात येणार आहे.
अनधिकृत वीज जोडणी करू नये व विद्युतमुळे होणारे अपघात टाळता यावे, यासाठी गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोड देण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळांनी अनधिकृत वीज जोडणी न करताना वीज यंत्रणेबाबत योग्य ती काळजी घेऊन अधिकृत वीज जोडणी घ्यावी.
- गुलाबराव कडाळे, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी, बुलडाणा.