शिंदी येथील शेतक-याला महावितरणचा शॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 06:57 PM2017-11-10T18:57:00+5:302017-11-10T19:02:28+5:30

शिंदी येथील एका शेतक-याला घरगुती वापरासाठी लावलेल्या मिटरमधून रिडींगची आकारणी न घेता ९८ हजार ३३० रुपयाचे बील पाठविले आहे. तर

Mahavitran give shok to shindi's farmer | शिंदी येथील शेतक-याला महावितरणचा शॉक!

शिंदी येथील शेतक-याला महावितरणचा शॉक!

Next
ठळक मुद्देघरगुती मिटरचे बिल १ लाख !साखरखेर्डा वीज वितरण कार्यालयाचा प्रतापबिलात फेरबदल करण्यासाठी दिला सिंदखेडला जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ बिलाची आकारणी करुन वीज वितरण कंपनीने चांगलेच जेरीस आणले असून वाढून आलेले बील कमी करायचे असेल तर सिंदखेडराजाला जावून कमी करा असा आदेश साखरखेर्डा वीज वितरण कार्यालयाचा कारभार झाला आहे. शिंदी येथील एका शेतकºयाला घरगुती वापरासाठी लावलेल्या मिटरमधून रिडींगची आकारणी न घेता ९८ हजार ३३० रुपयाचे बील पाठविले आहे.
संजाबराव शामराव बंगाळे या व्यक्तीला वीज वितरण कंपनीने आॅक्टोबर महिण्याचे वीज बिल तब्बल ९८ हजार ३३० रुपये आकारले. गेल्या तीन महिन्यापासून सतत बील वाढवून आले असता दोन वेळा त्यांनी सिंदखेडराजा येथे जावून बील कमी करुन आणले. त्यांनी रिडींगनुसार बील मिळावे म्हणून अर्जही केले. परंतू पुन्हा त्यांना हे लमसंम रकमेचे देयक आले आहे. साखरखेर्डा भागातील नागरिकांना बिलात दुरुस्ती करायची असेल तर सिंदखेडराजा येथे जावून करावी लागते. स्थानिक कार्यालयात अभियंता नसल्याने येथील प्रभार काकडे या अधिकाºयाकडे आहे. दोन ठिकाणचा कारभार एकाच व्यक्तीकडे असल्याने ग्रामीण भागात वेळ देवू शकत नाही. समस्या आहेत.
कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा न करता तांत्रिक बिघाडामुळे १५-१५ दिवस वीज सुरळीत होत नाही. डी.पी.वरील पार्ट मोठ्या प्रमाणात चोरीला जात असून ते पार्ट (सुटे भाग) टाकण्यासाठी पैशाची मागणी केल्या जाते. त्यामुळे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले आहेत. साखरखेर्डा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरुन शेतकºयांच्या समस्या तेथेच सोडवाव्यात अशी मागणी सरपंच महेंद्र पाटील, शिंदीचे माजी सरपंच गंभीरराव खरात यांनी केली आहे.

Web Title: Mahavitran give shok to shindi's farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.