सिंदखेड राजात ४१ ग्रामपंचायतींवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:31 AM2021-02-05T08:31:28+5:302021-02-05T08:31:28+5:30
दोन दिवसांपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले,मात्र महिला आरक्षण शुक्रवारी असल्याने तालुक्याचे याकडे लक्ष लागून होते. आज बुलडाणा येथे ...
दोन दिवसांपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले,मात्र महिला आरक्षण शुक्रवारी असल्याने तालुक्याचे याकडे लक्ष लागून होते. आज बुलडाणा येथे झालेल्या आरक्षण सोडतीत ८० पैकी ४१ ठिकाणी महिला सरपंच विराजमान होणार आहेत. दरम्यान,नुकत्याच झालेल्या ४३ ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीच्या लढती झाल्या असल्या तरीही आता या ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे दावेदार आमने सामने येत आहेत. यापैकी अर्ध्याधिक ग्रामपंचायतीत महिला सरपंच होणार असल्याने निवडून आलेले सदस्य आपल्याच घरची लक्ष्मी सरपंच कशी होईल याचे नियोजन करण्यात गुंतले आहेत. तालुक्यातील साखरखेर्डा व दुसरबीड या दोन्ही ग्रामपंचायतीत नेमके आरक्षण महिलेला असणार की पुरुषाला याची चर्चा होती. परंतु ओबीसीसाठी सुटलेल्या दुसरबीडमध्ये महिला आरक्षण असणार नाही तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या साखर खर्डा येथेही पुरुष सरपंच असणार असल्याने अनेक प्रस्थापितांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
महिला आरक्षण सर्वसाधारण : सोयंदेव, कोनाती,गोरेगाव,मोहाडी, वाघोरा,धांदर्वडी,पिंपळगाव सोनाती,लेंडी पिंपळगाव, वडळी,निमगाव वायाल,चिंचोली जहांगीर,पिंपळगाव कुडा,अंचली,गुंज, विझोरां,देऊळगाव कोळ, जंभोरा,जगदरी, हनुवतखेड (सिराजा),नाईक नगर. नामाप्र: वरुडी,आडगाव राजा, तडशिवणी,रताळी, वाघाळा,दरेगाव, देवखेद,सायला,खैरव,मलकापूर पंग्रा,महारखेड.
अनुसूचित जमाती : रुम्हणा अनुसूचित जाती : साठेगाव,खामगाव,कंडारी,हिवरखेड पूर्णा, उमरद,आंबेवाडी, पोफल शिवानी, कुमेफळ, गारखेड.