संग्रामपूर, मोताळा नगरपंचायतींमध्ये येणार ‘महिलाराज’

By admin | Published: August 21, 2015 01:40 AM2015-08-21T01:40:36+5:302015-08-21T01:40:36+5:30

नगरपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर ; ३४ पैकी १८ जागांवर महिलांना प्रतिनिधित्व.

'Mahilaraj' will come in Sangrampur, Motala Nagar Panchayat | संग्रामपूर, मोताळा नगरपंचायतींमध्ये येणार ‘महिलाराज’

संग्रामपूर, मोताळा नगरपंचायतींमध्ये येणार ‘महिलाराज’

Next

मोताळा/संग्रामपूर (जि. बुलडाणा) : नव्याने स्थापन झालेल्या मोताळा व संग्रापूर या दोन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या दृष्टिकोणातून निवडणूक आयोगाने २0 ऑगष्ट रोजी आरक्षण निश्‍चित केले. सकाळी ११ वाजल्यापासून तहसील कार्यालयात यासंदर्भात आरक्षण सोडत घेण्यात आली. मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतीमध्ये प्रत्येकी १७ पैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव निघाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या नगर पंचायतींवर महिलांचे प्रभुत्व राहणार आहे. मोताळा नगरपंचायतीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखेडे व तहसीलदार सुनील शेळके यांनी मोताळा नगरपंचायतीचे आरक्षण चिठ्ठय़ा टाकून नागरिकांसमोर काढले. आरक्षणामध्ये १७ पैकी ९ महिला वॉर्ड आरक्षित निघाले आहेत. यामध्ये एक एस.सी., इतर तीन मागासवर्गीय व पाच सर्वसाधारण महिलांसाठी वार्ड राखीव निघाले आहे. मोताळ्यात १७ प्रभागांची रचना करण्यात आली असून प्रभागातील १७ जागांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. आरक्षणामध्ये वॉर्ड क्र. १, ३, ४, स्त्री, ना. मा. प्र. राखीव, वॉर्ड क्र. ११- स्त्री अनुसुचित जाती राखीव, वॉर्ड क्र-१५ अनुसूचित जातीसाठी, वॉर्ड क्र-६ व १२- नामाप्र राखीव, वॉर्ड क्र-१0, ८, १३, १४, १७ सर्व साधारण महिला व वॉर्ड क्र-२, ५, ७, ९ व १६ सर्वसाधारण साठी आरक्षीत करण्यात आले आहे. संग्रामपूर नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर पहिल्या नगरपंचायतच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असुन २0 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांचे प्रमुख उपस्थितीत नगर पंचायत संग्रामपुरची सार्वत्रिक निवडणूक २0१५ साठी आरक्षण सोडत घेण्यात आली आली. या सोडतीमध्ये ९ जागा महिलांसाठी तर ८ जागा पुरूषांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे नगरपंचायतीमध्ये महिला सदस्यांचाच बोलबाला राहणार आहे. संग्रामपूर नगरपंचायतची लोकसंख्या ७ हजार २५८ असून त्यापैकी १ हजार ८ अनुसुचित जाती तर ११४ अनुसुचित जमातीची लोकसंख्या आहे. यामध्ये १७ वार्ड असून, या वॉर्डाच्या चिठ्ठय़ा विजय विठ्ठल साबे रा. पाळोदी ता. शेगाव या ८ वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यामध्ये वॉर्ड क्र.१ इतर मागासवर्गीय महिला वॉर्ड क्र.२ अनु.जाती महिला, वॉर्ड ३ सर्वसाधारण, वॉर्ड ४ सर्वसाधारण, वॉर्ड ५ सर्वसाधारण, वॉर्ड ६ इतर मागासवर्गीय महिला, वॉर्ड ७ इतर मागासवर्गीय महिला, वॉर्ड ८ इतर मागासवर्ग, वॉर्ड ९ सर्वसाधारण महिला, वॉर्ड १0 सर्वसाधारण महिला, वॉर्ड ११ सर्वसाधारण, वॉर्ड १२ इतर मागासवर्ग, वॉर्ड १३ सर्वसाधारण महिला, वॉर्ड १४ अनुसुचित जाती, वॉर्ड १५ सर्वसाधारण महिला, वॉर्ड १६ सर्वसाधारण, वॉर्ड १७ सर्वसाधारण महिला अशाप्रकारे १७ वॉर्डाचे आरक्षण काढण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार तथा प्रशासक पी.एम. दाभाडे, ग्रामविकास अधिकारी आर.बी. देठे गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नगरपरिषदचे वरिष्ठ लिपिक रामेश्‍वर गायकी यांनी केले.

Web Title: 'Mahilaraj' will come in Sangrampur, Motala Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.