बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:29+5:302021-05-12T04:35:29+5:30

बुलडाणा : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांत नियुक्त करण्यात आलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित करण्यात येत आहे़ ...

Maintain the service of BAMS Medical Officers | बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा कायम ठेवा

बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा कायम ठेवा

Next

बुलडाणा : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांत नियुक्त करण्यात आलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित करण्यात येत आहे़ त्यांच्या जागेवर एमबीबीएस बंधपत्रित डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे़ काेराेना काळात सेवा करणाऱ्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा कायम ठेवण्याची मागणी बीएएमएस गट ‘अ’ तदर्थ, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास धरणे आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे़

एम.बी.बी.एस. अर्हताधारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठीकाणी (गट-अ पदावर) बी.ए.एम.एस. अर्हताधारक डॉक्टरांमधुन कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यास शासनाने परवानगी दिली हाेती़ काेराेनाकाळात आराेग्य सेवा करणाऱ्या बीएएमएस डाॅक्टरांची सेवा खंडित करण्यात येत आहे़ एमबीबीएस बंधपत्रित डाॅक्टर उपलब्ध झाल्याने बीएएमएस डाॅक्टरांची सेवा खंडित करण्यात येणार आहे़ त्यामुळे, अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे़ सध्या काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ आराेग्य विभागावर ताण वाढत आहे़ डाॅक्टर आणि परिचारिकांची संख्या ताेकडी पडत आहे़ दुसरीकडे नियुक्त केलेल्या बीएएमएस डाॅक्टरांची सेवा खंडित करण्यात येत आहे़ काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने अनुभवी बीएएमएस डाॅक्टरांची सेवा कायम सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ बंधपत्रीत एमबीबीएस पुढील शिक्षणासाठी गेल्यानंतर जिल्ह्यातील आराेग्य सेवा पुन्हा काेलमडण्याची शक्यता आहे़ एका प्राथमिक आराेग्य केंद्रात दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते़ काेराेनाचा काळ पाहता तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून बीएएमएस डाॅक्टरांची सेवा जेथे सुरू हाेती तिथेच सुरू करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे़

एमबीबीएसची नियुक्ती ग्रामीण रुग्णालयांमध्ये करा

बंधपत्रित एमबीबीएस डाॅक्टरांची नियुक्ती करायचीच असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात करावी़ तिथे अनेक पदे रिक्त आहेत़ या पदावर त्यांची नियुक्ती करावी़ आराेग्य केंद्रामध्ये आराेग्य सेवेबराेबरच इतरही प्रशासकीय कामे असतात़ त्यामुळे बीएएमएस डाॅक्टरांची सेवा कायम ठेवण्याची मागणी निवेदनात केली आहे़

Web Title: Maintain the service of BAMS Medical Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.