दोन दिवस साजरी होणार मकरसंक्रांत; १७ वर्षांनंतर जुळून आला योग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:29 AM2018-01-14T00:29:58+5:302018-01-14T00:30:17+5:30
लोणार : मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी सगळीकडे साजरी केली जाते; मात्र यावेळची मकरसंक्रांत विशेष असून, १७ वर्षांनंतर पौष रविवारी संक्रांत असा योग जुळून आला आहे. याआधी २00१ मध्ये हा योग आला होता. तसेच यावर्षी दोन दिवस मकरसंक्रांत साजरी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी सगळीकडे साजरी केली जाते; मात्र यावेळची मकरसंक्रांत विशेष असून, १७ वर्षांनंतर पौष रविवारी संक्रांत असा योग जुळून आला आहे. याआधी २00१ मध्ये हा योग आला होता. तसेच यावर्षी दोन दिवस मकरसंक्रांत साजरी केली जाणार आहे.
१४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, त्यानं तर १५ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजून ११ मिनिटांपर्यंत संक्रांत असेल. रविवारचा कारक ग्रह सूर्य असून, हा सणही सूर्यदेवाचा आहे. त्यामुळे २0१८ च्या मकरसंक्रांतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिण दिशेहून उत्तर दिशेत जातो, त्यानंतर खरमास सप्ताह असतो. राज्यात मकरसंक्रांत सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी १३ जानेवारी, संक्रांती १४ जानेवारी व किंक्रांती १५ जानेवारी अशी नावे आहेत. संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायण संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी तीळमि२िँं१्रूँं१त पाण्याने स्नान करायचे. तिळाची भाकरी, वांग्याचे भरीत, मिश्र भाजी करण्याची प्रथा आहे. संक्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्याप्रमाणे आपण दसर्याला मोठय़ा लोकांना आपट्याची पाने देऊन त्यांचे आशीर्वाद घेतो, त्याचप्रमाणे संक्रांतीलाही तीळगूळ वाटून नात्यांमधील गोडवा आणखी वाढावा, यासाठी ‘तीळगूळ घ्या, अन् गोड-गोड बोला’, असा संदेश दिला जातो. आपली जुनी भांडणे विसरून पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठी संधीच असते. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, त पाला विशेष महत्त्व आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे. प्रत्येक राशीनुसार दान असल्याचे बोलले जाते. संक्रांतीच्या दिवशी काळय़ा वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या साड्या, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात विक्रीसाठी दिसू लागतात. (प्रतिनिधी)
पतंगोत्सवाची परंपरा
- मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी ज्या प्रकारे आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांचे पतंग उडताना दिसतात.
- संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे ‘बोर न्हाण’ केले जाते. यावेळी लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात.