ऑक्सिजन निर्मितीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण बनवा- शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:10+5:302021-05-03T04:29:10+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात १ मे रोजी कोविड संसर्ग नियंत्रण बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात १ मे रोजी कोविड संसर्ग नियंत्रण बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे उपस्थित होते.
रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचे वितरण आता जिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे. रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. रेमडेसिविर औषधांच्या रिकाम्या कुप्यांची योग्य विल्हेवाट लावावी. इंजेक्शन दिलेल्या रूग्णांचे नाव, हॉस्पिटलचे नाव याचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे. रेमडेसिविर वितरण करताना रूग्णालयातील बेडची संख्या गृहीत धरावी. घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे रेमडेसिविर येत असल्यास तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट तातडीने सुरू करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा. लिक्विड ऑक्सिजन टँकमधून ड्युरा व जम्बो सिलेंडर भरण्याची सुविधा सुरू करावी. तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्याची कार्यवाही करावी. जळगाव येथील कोविड हॉस्पिटल व हिवरा आश्रम येथील सेंटरही तातडीने सुरू केले जावे, असे त्यांनी सांगितले.
--पालिका क्षेत्रासाठी विद्युत दाहिनी--
जिल्ह्यातील सर्वच पालिका व नगर पंचायत क्षेत्रासाठी विद्युत दाहिनीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. सर्व पालिकांना विद्युत दाहिनी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमध्ये भोजन पुरविणाऱ्या कंत्राटदारांची देयके त्वरेने अदा केली जावी. बैठकीस सीएस डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. आर. जे. सांगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.