‘मी कर्जमुक्त होणार’चा लढा यशस्वी करा - जाधव
By Admin | Published: June 4, 2017 01:35 PM2017-06-04T13:35:49+5:302017-06-04T13:35:49+5:30
‘मी कर्जमुक्त होणारच’ हा लढा यशस्वीकरण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हासंपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.
बुलडाणा : देशाला अन्न धान्याने समृध्द करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांवर
उपासमारीची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे ह्ययोगीह्ण सरकार
कर्जमाफी देते उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या
मोठ्या प्रमाणात आहे. मात्र भाजपाचेच सरकार येथे कर्ज माफी देण्यास
टाळाटाळ करते. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरते. ही मुजोरी हाणून पाडण्यासाठी
शिवसेना पक्षप्रमुख यांनी पुकारलेला ह्यमी कर्जमुक्त होणारचह्ण हा लढा यशस्वी
करण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हा
संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.
शेकापूर येथे कर्जमुक्त अभियानाच्या दृष्टीने शिवसेनेचा बुलडाणा तालुका
मेळावा २८ मे रोजी पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजी
जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, संजय गायकवाड, मेहकर कृ.उ.बा.स.उपसभापती
बबनराव तुपे, डॉ.मधुसुदन सावळे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनश्रीराम
शिंपणे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, दादाराव खार्डे, भोजराज
पाटील, कृ.उ.बा.स.संचालक शरद टेकाळे, गजानन मुठ्ठे, पं.स.सदस्य श्रीकांत
पवार, हरीभाऊ सिनकर, माजी पं.स.सभापती सुधाकर आघाव यांची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी खा.जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करण्याचे वचन
शिवसेनेने दिले आहे. यासाठी प्रसंगी सत्तेला लाथ मारण्याचेही पक्षप्रमुख
उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपला
वठवणीवर आणण्यासाठी शिवसेनेने मी कर्ज मुक्त होणारच लढा पुकारला आहे.
भाजपने निवडणूकीसाठी दिलेला कर्जमुक्ती शब्द पाळला नाही. केवळ निवडणूका
जिंकण्यासाठी हे गाजर दाखवण्यात आले. शिवसेना ही सत्तेसाठी नाही तर
समाजासाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या लढयात फॉर्म भरुन द्यावेत.
जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरुन पाठवायचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले, शिवसेनेचे कर्जमुक्ती अभियान
यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
अन्नदात्याच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष करण्याचे पाप त्यांना नक्कीच
महागात पडणार आहे. असेही ते म्हणाले. संचालन उपतालुका प्रमुख गजानन
टेकाळे यांनी केले. यावेळी अनिल जगताप, ज्ञानेश्वर दांडगे, राजु मुळे,
माजी पं.स.सदस्य गणपत दांडगे, विजय इतवारे माणिकराव सावळे, संजय जाधव,
शेषराव सावळे, गजानन धंदर, हरिभाऊ दांडगे, गजानन नरोटे, मोहन निमरोट,
गोपाल बारवाल, संतोष गायकवाड, शांताराम पालकर, मंगेश तायडे, वसंता
सुरडकर, योगेश पायघन, समाधान बुधवत, उदेभान तायडे, गजानन तायडे, रमेश गोर
आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)