शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग माेकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:49+5:302021-02-07T04:32:49+5:30
बुलडाणा : येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आराेग्य विभागाने मान्यता दिली असून आता अंतिम टप्यातील मान्यतेसाठी कॅबिनेटच्या बैठकीत ...
बुलडाणा : येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आराेग्य विभागाने मान्यता दिली असून आता अंतिम टप्यातील मान्यतेसाठी कॅबिनेटच्या बैठकीत येत्या काळात हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, बऱ्याच कालवधीपासून रखडलेल्या बुलडाण्यातील या वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण पहिला टप्पा मार्गी लागला आहे.
दुसरीकडे बुलडाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जवळपास ४५० काेटी रुपये खर्च अपेक्षित असून गेल्या आठवड्याभरापूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी आराेग्य मंत्री ना. राजेश टाेपे यांच्याशी सविस्तर चर्चा केली हाेती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय महाविद्यालयाचा मार्ग आता जवळपास माेकळा झाला आहे.
जालना, बुलडाणा, परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. पुढे ते म्हणाले की मी मंत्री झाल्यानंतर उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यक्ष मान्यता दिली आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू होतील.
हिंगोली, गडचिरोली जिल्हेही महाविद्यालय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत