मलगी ग्रामपंचायत अविराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:39+5:302021-01-10T04:26:39+5:30

चिखली : सद्य:स्थितीत सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. या निवडणुका गावकी व भावकीच्या वादास कारणीभूत ठरू नयेत यासाठी ...

Malagi Gram Panchayat unopposed | मलगी ग्रामपंचायत अविराेध

मलगी ग्रामपंचायत अविराेध

Next

चिखली : सद्य:स्थितीत सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. या निवडणुका गावकी व भावकीच्या वादास कारणीभूत ठरू नयेत यासाठी गावाची निवडणूक अविरोध पार पाडा, या पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत मलगी ग्रामस्थांनी ग्रापंचायतीची निवडणूक अविरोध पार पाडली आहे.

तालुक्यातील पाच, तर मतदारसंघातील सात गामपंचयतींची निवडणूक अविरोध पार पडली आहे. यातील मलगी ग्रामपंचायतीतून निवडणूक लढण्यास अनेक सदस्य इच्छुक होते. यामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले होते. या पृष्ठभूमीवर अन्न व औषधी प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी गावाची निवडणूक अविरोध पार पाडण्याचे आवाहन केले होते. त्या आनुषंगाने गावातील अनुसुचित जाती-जमाती आणि मराठा-ओबीसी प्रवर्गातील युवावर्गासह गावातील बुजुर्ग मंडळींनी एकत्र येत योग्य समन्वय साधून ग्रामहितासाठी ही निवडणूक अविरोध पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांस उत्तम यश आल्याने सात सदस्य संख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध पार पडली आहे. दरम्यान, डॉ.शिंगणे यांच्या आवाहनानुसार गावातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासह सामाजिक समतोल या माध्यमातून राखल्या गेल्याने येथील गावपुढारी, युवावर्ग व ग्रामस्थांचे काैतुक हाेत आहे.

Web Title: Malagi Gram Panchayat unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.