मलकापुरात धिक्कार मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:08 AM2017-10-13T00:08:15+5:302017-10-13T00:08:25+5:30

माता महाकाली नगरातील संतप्त नागरिकांनी गुरुवारी पालिका प्रशासनाविरुद्ध धिक्कार मोर्चा काढून तहसील चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

Malakpura Dhikar Front! | मलकापुरात धिक्कार मोर्चा!

मलकापुरात धिक्कार मोर्चा!

Next
ठळक मुद्देमाता महाकाली नगरातील अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील माता महाकाली नगरातील नगीनदास बेरागी  यांनी देवी मंदिर परिसरात अनधिकृतरीत्या केलेले अतिक्रमण व  घाण पाण्यामुळे देवीची विटंबना या विषयावर निवेदन देऊन व  उपोषण करूनही कारवाई झाली नाही. त्या निषेधार्थ गुरुवारी  परिसरातील संतप्त नागरिकांनी पालिका प्रशासनाविरुद्ध धिक्कार  मोर्चा काढून तहसील चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
येथील माता महाकाली नगरातील रहिवासी नगीनदास बैरागी  यांनी माता महाकाली मंदिर परिसरात अनधिकृतरीत्या बांधकाम  करून अतिक्रमण केले आहे. सांडपाण्याचा निचरा करून  त्यांच्याकरवी मंदिराची विटंबना सुरु असल्याचा आरोप माता  महाकाली नगरातील असंख्य पुरुष व महिलांचा आहे.
त्यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.  ऑगस्ट महिन्यात उपोषण करण्यात आले असता कारवाईचे  आश्‍वासन नगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. प्र त्यक्षात मात्र कारवाई नाही. त्याच्या निषेधार्थ माता महाकाली  नगरातील संतप्त पुरुष, महिला १२ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उ तरले. बुलडाणा रस्त्यावरून दुपारी १२ वाजता धिक्कार मोर्चा  काढण्यात आला.
नगरपालिका प्रशासनाविरुद्ध तथा नगराध्यक्षाविरुद्ध मुर्दाबाद  मुर्दाबादची नारेबाजी करून तहसील चौकात आंदोलनकर्त्यांनी  रास्ता रोको आंदोलन केल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली. 
या आंदोलनात कृष्णा मेहसरे, अनिल बगाडे, राजू सपकाळ,  प्रकाश धोरण, श्रद्धा धोरण, भाग्यश्री मेहसरे, रुख्मिणी दाणे,  अनुसया भोपळे, सविता वेरुळकर, उर्मिला जुनारे, चंद्रकला  खांडेकर, कांताबाई जाधव, वत्सलाबाई ढोले, अर्चना चित्ते,  सयाबाई धोडे, श्रुती पटणी, मथुरा ढोले, जनाबाई बगाडे  आदींसह असंख्य पुरुष व महिला सहभागी होत्या.

माता महाकाली नगरातील अनधिकृत बांधकामाविषयी संबंधि तास कायदेशीर नोटीस देण्यात आली. विहित कालावधीमध्ये  त्यांनी निर्धारित रक्कम भरून नवीन नियमानुसार बांधकाम  रेग्युलर करण्याविषयी मागणी केल्याने तशी कारवाई प्रशासनाला  करावी लागते. उर्वरित विषयात नियमानुसारच कारवाई होईल.
- श्रीनिवास कुरे,
मुख्याधिकारी, न.प. मलकापूर.

माता महाकाली मंदिराची जागा वडलोपाजिर्त सात पिढय़ांपासून  आमच्या ताब्यात आहे. तसे कागदोपत्री पुरावेदेखील  आमच्याजवळ आहेत; पण काही मंडळी राजकीय द्वेषापायी  वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत. मंदिर परिसरातील  जागा आमच्याकडून बळकाविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
- नगीनदास बैरागी,
माता महाकाली नगर, मलकापूर.

Web Title: Malakpura Dhikar Front!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.