देऊळगाव माळी येथे हिवताप व लसीकरण जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:36+5:302021-06-16T04:46:36+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी मार्फत १४ जून रोजी गावामध्ये प्रभात फेरी काढून हिवताप जनजागृती तसेच काेविड-१९ लसीचे महत्व ...
प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी मार्फत १४ जून रोजी गावामध्ये प्रभात फेरी काढून हिवताप जनजागृती तसेच काेविड-१९ लसीचे महत्व पटवून देण्यात आले. पावसाळ्यात डेंग्यू ,मलेरिया यासारखे जलजन्य आजार वाढू नये यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी तसेच आपल्या घरातील भांडी रिकामी करून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने आव्हान करण्यात आले. यावेळी डॉ. पल्लवी मगर, डॉ. पूनम भराड,डॉ. रुहाटिया, डॉ. रूपाली इंगळे ,डॉ. प्रवीण गाभणे, आरोग्य सहाय्यक जगताप ,आरोग्य साहायक श्रीमती लहाने ,देवकर ,घायाळ ,जेऊघाले, श्रीमती तांबेकर ,घाडगे ,इंगळे ,गवई, चव्हाण ,राठोड ,गोडाते सर्व आरोग्य कर्मचारी ,आशा गट प्रवर्तक ,आशा सेविका इत्यादी कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी होते.
===Photopath===
140621\1451-img-20210614-wa0019.jpg
===Caption===
दे.माळी