किनगाव जट्टू येथे हिवताप जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:22 AM2021-07-03T04:22:21+5:302021-07-03T04:22:21+5:30
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वातावरणाचे बदलामुळे डासांची उत्पत्ती हाेत आहे़ हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू इतर ...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वातावरणाचे बदलामुळे डासांची उत्पत्ती हाेत आहे़ हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू इतर आजार रोखण्यासाठी परिसराची स्वच्छता ठेवावी, भंगार सामानाची विल्हेवाट लावावी, घराच्या खिडक्यांना जाळ्या लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, घरातील पाणी साठवण्याचा हौद, टाक्या रांजण , माठ इत्यादी आठवड्यातून एक वेळ कोरडे करावे़ तसेच ताप आल्यास अंगावर न
काढता त्वरित दवाखान्यात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आराेग्य विभागाच्या वतीन करण्यात आले़ या मोहिमेमध्ये आरोग्य उप उपकेंद्राच्या सामुदायिक आधिकारी डाॅ़ कविता भिसे ,आरोग्य सेविका एस़ बी. पवार , आरोग्य सेवक जी़ एऩ सानप ,आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन हिवताप विषयी जनजागृती केली़