कोयाळी दहातोंडे येथे मलेरियाची साथ

By Admin | Published: September 13, 2014 12:25 AM2014-09-13T00:25:54+5:302014-09-13T00:25:54+5:30

सुलतानपूर आरोग्य केंद्रांतर्गत कोयाळी व उद्नापूर येथे मलेरियाच्या तापेने थैमान घातले आहे.

Malialies in Koli Dahtonday | कोयाळी दहातोंडे येथे मलेरियाची साथ

कोयाळी दहातोंडे येथे मलेरियाची साथ

googlenewsNext

कोयाळी दहातोंडे : सुलतानपूर आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या कोयाळी दहातोंडे व उद्नापूर येथे मलेरियाच्या तापेने थैमान घातले आहे. कोयाळी दहातोंडे व उद्नापूर येथे तब्बल एक वर्षापासून आरोग्य सेवक नसल्याने येथील रुग्णांचे आरोग्यसेवेअभावी हाल होत आहेत. गत आठ दिवसांपासून कोयाळी दहातोंडे येथे मलेरियाच्या तापेने रुग्ण फणफणत आहेत; परंतु आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे मात्र या गावाकडे मात्र दुर्लक्षच दिसून येत आहे. येथील रुग्णांना शासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा औषध पुरवठा किंवा तपासणी करण्यात आली नाही. गावात लसीकरण मोहीमसुद्धा वेळेवर राबविण्यात येत नाही. त्याबाबत ग्रामस्थांनी लेखी व तोंडी सूचना देऊनही आरोग्य विभाग गाढ झोपेतच आहे. सध्या पावसाच्या दिवसातही येथील पिण्याच्या पाण्याची त पासणी अद्यापपर्यंत प्रशासनाने केली नाही. त्यामुळे मलेरिया तसेच विविध आजारांचे रुग्णही आढळून येत आहेत. आरोग्य सेवकांअभावी रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

Web Title: Malialies in Koli Dahtonday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.