मलकापूर बारादारीतील दगफेकप्रकरणी ३३ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 03:57 PM2020-04-05T15:57:02+5:302020-04-05T16:09:47+5:30

बारादारीतील दगफेकप्रकरणी ३३ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Malkapur Baradari riot case: 33 booked | मलकापूर बारादारीतील दगफेकप्रकरणी ३३ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

मलकापूर बारादारीतील दगफेकप्रकरणी ३३ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर: संपूर्ण शहरात लॉकडाऊन असताना येथील बारादारीत दोन समाजाच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील ३३ जणाविरूध्द दंगलीचे गुन्हे दाखल केले आहे. ३० जणांना गजाआड करण्यात आले असून ३ जण फरार आहेत. बारादारितील पायविहीरीजवळ सोनू उर्फ सचिन हांडगे याला याच भागातील साबीर व जावेद या तरूणांचा धक्का लागल्यावरून वाद झाला. एकमेकांना शिविगाळ व धक्काबुक्की देखील झाली .हा प्रकार दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. तब्बल तीन तासानंतर दोन्ही समाजातील तरुण पायविहीरीजवळ एकमेकांना भिडले. लाठ्या काठ्यांनी हाणामारी व जबरदस्त दगफेक देखील झाली.त्यामुळे बारादारीत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास नागरे  पोलीस तुकडीसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने दोन्ही गटातील तरुणांनी पळापळ केली. त्यानंतर परिसरातील वातावरण निवळले. दरम्यान, लॉकडाऊन असताना तसेच शहरात शांतता असताना बारादारीत हा प्रकार घडल्याने पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. रात्री उशीरापर्यंत दोन्ही गटातील ३० जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. शहर पोलिसांनी अपराध नं.२८५/२०२० व अपराध नं.२८६/२०२० अन्वये दोन्ही गटातील ३३जणांंविरूध्द कलम १४३,१४७,२४८,१४९,३३६,३३७,१८८,२६९,२७०,५०४,३२४ भा.द.वी.चे गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटातील एका गटात रफिकखा अताऊल्लाखा, शे.हुसैन शे.जहानूद्दीन, तनवीरबेग हसनबेग, असलमखा रहीमखा, सै.रहीम सै.नुरा, मो शाहीद मो.नुरा, शे.ईस्माइल शे.हसन, जुबेरखान हुसेनखान, साबिरबेग आमिरबेग, नुरखारहीमखा, शे.अफजलशे.रसूल, हुसेनखा अब्बासखा, सै.रयीस सै.रहीम, शे.अतिक शे.अफजल, असीमबेग रहीमबेग, जावेदखा नुरखा, सै.गफुर सै.नुरा, साबिरखा रशिदखा, सिकंदरखा अकीलखा, शे.युसूफ शे.मुसा, दानीशबेग हाशमबेग, शे.अक्रम शे.नजीर,सोहेबखा करीमखा, शे.नजीर शे.सादीक, शे.हसन शे.गफ्फार, शेख फिरोज, साबीरगखन रा.बारादारी तर दुसºया गटातील सोनू उर्फ सचिन हांडगे, संतोष हांडगे, पवन गजानन गरुड, गजानन पांडुरंग गरूड, आकाश विजय तारापूरे, गणेश विजय तारापूरे रा.मंगलगेट अशा  ३० जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. यात दोन्ही गटातील ३ जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title: Malkapur Baradari riot case: 33 booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.