विदर्भाचे प्रवेशद्वार ठरतेय कोरोना हॉटस्पॉट; २७ टक्के कोरोनाबाधित मलकापूरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:27 PM2020-06-03T12:27:19+5:302020-06-03T12:28:06+5:30
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आढलेल्या ४५ रुग्णापैकी २७ टक्के म्हणजे १२ रूग्ण मलकापूरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- हनुमान जगताप
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आढलेल्या ४५ रुग्णापैकी २७ टक्के म्हणजे १२ रूग्ण मलकापूरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच प्रवेद्वार कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट होऊ घातला आहे.
कोरोना संसर्गाची जगभरात दहशत पसरली असताना मलकापुरात १४ एप्रिल रोजी चार जण कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनुक्रमे जळगाव खान्देश व मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे येथील महिला व त्या नंतर नरवेल येथे चिमुकली असे रुग्ण कोरोना पॉझिटिव्हआले.उपचारानंतर ते निगेटिव्ह होवून स्वगृही परतले.
आधीच लाँकडाऊन मग ५०० मिटर एरिया सिल यातून ते रुग्ण निगेटिव्ह आल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण मलकापूरातील रेलचेल पूर्वपदावर आली. विस्कळीत जनजिवन सुरळीत झाले. पण २८ मे रोजी भिमनगरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या नंतर ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर २९ व ३० अशा दोन दिवसात सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर शहरात एकच दहशत पसरली.रविवारी उशिरा रात्री शहरातील चार तर तालुक्यातील मौजे धरणगांव येथील एक असे पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर पुन्हा शहर व तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे त्या रुग्णात येणाऱ्या काळात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या २० दिवसात ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.