मलकापूर : नदीपात्रातून रेती चोरीसाठी वापरलेली बोट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:25 AM2018-02-01T00:25:38+5:302018-02-01T00:26:17+5:30
मलकापूर : हरसोडा जुने शिवारात गावापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीचे पात्रातून रेतीच्या उपसासाठी वापरल्या जाणारी बोट तहसिलदारांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : हरसोडा जुने शिवारात गावापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीचे पात्रातून रेतीच्या उपसासाठी वापरल्या जाणारी बोट तहसिलदारांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी केली.
तहसिलदार विजय पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, स्वयंचलीत बोटीव्दारे मोठय़ा प्रमाणावर अवैधरित्या रेतीचा उत्खनन सुरू आहे. ३१ जानेवारी १८ चे सायंकाळी ५ वाजता संपुर्ण पथकासह लपत छपत जावून छापा टाकला असता पुर्णा नदीचे पात्रात रेती उत्खनन करीत असलेली स्वयंचलीत बोटी वरील लोक हे बोट तेथेच उभी करून पळून गेले. या ठिकाणी पाहणी केली असता पूर्णा नदीचे पात्रात रेती उपसा करणारी स्वयंचलीत बोट उभी असून सदर बोटीला सेक्शन पंप, प्लॉस्टीक हॉस पाईप असे साहित्य जोडलेले असून बोटीचे बाजुला नदीचे पात्राचे किनार्यावर रेती खळवण असल्याचे दिसून आले आहे. स्वयंचलीत बोट व सेक्शन पंप असे एकुण अंदाजे ६ लाख (सहा लक्ष रूपये) चा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला आहे. या कारवाईत तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसीलदार गजानन राजगडे, तलाठी साळवे, बाळू जाधव व कमांडोनी सहभाग घेतला.
पुर्णा नदीपात्रातून गौण खनिजाची चोरी सुरुच आहे. रात्रीच्या वेळी गौण खनिज चोरी होत असल्याने रात्रीच कारवाई करण्याचा धडाका तहसिलदारांनी लावला आहे.