मलकापूर बसस्थानकातील खांबाला बसची धडक; सहा प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:09 IST2018-01-24T13:06:21+5:302018-01-24T13:09:15+5:30
मलकापूर : आगारात परतलेली बस ब्रेक फेल झाल्याने बसस्थानकातील खांबावर जोरदार धडकली. त्यात सहा प्रवाशी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता घडली.

मलकापूर बसस्थानकातील खांबाला बसची धडक; सहा प्रवासी जखमी
मलकापूर : आगारात परतलेली बस ब्रेक फेल झाल्याने बसस्थानकातील खांबावर जोरदार धडकली. त्यात सहा प्रवाशी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता घडली. मलकापूर आगाराची बस क्रमांक एमएच ४० - एन ८०९० सकाळी ६ वाजता नरवेल येथून मलकापूर बसस्थानकावर पोहचली. चालकाने शेवटी बस थांबविण्यासाठी ब्रेक दाबले असता, ब्रेक लागले नाहीत. बस वेगाने बसस्थानकावर घुसली. त्यात बस खांबावर धडकली. बसमधील भिवसेन आनंदा रावळकर (५८), रमेश विष्णू चव्हाण (६०), शुभांगी प्रभाकर चंदनकार (१२), प्रतीक्षा मोहन सावळे (१२), कार्तिक मधुकर कोलते (१२), वैभव राजेंद्र ब्राहाटे (१२) असे सहा प्रवाशी जखमी झाले. जखमी विद्याथीर्नीच्या फोन वरून नगराध्यक्ष हरीश रावळ, पत्रकार विरसिंह राजपूत आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.