‘मलकापूर, नांदुरा दुष्काळग्रस्त घोषित करा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:10 AM2017-08-19T00:10:22+5:302017-08-19T00:10:29+5:30

मलकापूर : मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा तत्काळ  दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा तसेच शेतकर्‍यांना तातडीने  आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मलकापूर व नांदुरा  तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १८ ऑगस्ट रोजी उपविभागीय  अधिकारी यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

'Malkapur, Nandura declare drought!' | ‘मलकापूर, नांदुरा दुष्काळग्रस्त घोषित करा!’

‘मलकापूर, नांदुरा दुष्काळग्रस्त घोषित करा!’

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेची ‘एसडीओं’कडे निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा तत्काळ  दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा तसेच शेतकर्‍यांना तातडीने  आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मलकापूर व नांदुरा  तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १८ ऑगस्ट रोजी उपविभागीय  अधिकारी यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पाऊस मात्र दडी  मारून बसला आहे. अशा भयावह परिस्थितीत मलकापूर व  नांदुरा तालुक्यातील शेतकरीवर्ग हा हवालदिल झाला आहे.
या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करीत मलकापूर विधानसभा म तदारसंघातील मलकापूर व नांदुरा या दोन्ही तालुक्यात दुष्काळ  जाहीर करून शेतकर्‍यांना तगविण्याकरिता आर्थिक मदतीचा हात  देण्यात यावा, अन्यथा शेतकरी हितास्तव शिवसेनेच्यावतीने  आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात  आला. निवेदन देताना शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने,  तालुका प्रमुख विजय साठे, शहर प्रमुख किशोर नवले, लाला  इंगळे, मधुकर पाटील, अरुण अग्रवाल, विनय जवरे, ओंकारसिंग  डाबेराव, जगन रायपुरे, एकनाथ डवले, उमेश हिरुळकर, अमोल  टप, उमेश राऊत, मुकेश ललवाणी, योगेश ढगे, नितीन खराटे,  संभाजी सहावे, निना पाटील, स्वप्निल तळेकर, मंगेश सोनोने,  सचिन चव्हाण, मंगेश सोनोने, विशाल मालवाडे, संतोष पाटील,  विनोद बोदडे, अक्षय हुबे आदी पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांची  उपस्थिती होती. 

पावसासाठी काँग्रेसचे महादेवाला साकडे
मलकापूर : पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकू लागली आहेत.  शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, पावसाची चातकाप्रमाणे वाट  पाहत आहे. शेतकर्‍यांची ही दयनीय अवस्था दूर व्हावी, याकरिता  शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वरुणराजाला प्रसन्न  करण्याकरिता भुलेश्‍वर संस्थानातील महादेवाला जलाभिषेक  करण्यात येऊन काँग्रेसच्यावतीने पावसासाठी साकडे घालण्यात  आले.
मलकापूर तालुका व शहर भाराकाँच्यावतीने नगराध्यक्ष तथा  तालुका अध्यक्ष अँड.हरीश रावळ, शहर अध्यक्ष राजू पाटील  यांच्या हस्ते महादेवाला जलाभिषेक करण्यात आला, तर उपस्थित  जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस मंगला पाटील,  सुनीता जंगले, प्रमोद अवसरमोल, गजानन ठोसर, ज्ञानदेव तायडे,  युसूफखा उस्मानखा, जाकीर मेमन, नवृत्ती तांबे, विनायक  देशमुख, डॉ.प्रदीप सुपलेकर, अनिल मुंधोकार, रंजित डोसे, राजू  उखर्डे आदी पदाधिकार्‍यांनी पावसाकरिता सामूहिकरीत्या साकडे  घातले.

Web Title: 'Malkapur, Nandura declare drought!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.