मलकापूरः तलवारीच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 04:11 PM2019-05-28T16:11:14+5:302019-05-28T16:11:20+5:30
मलकापूरः क्षल्लक वादातून येथील मुकुंद नगरात झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला.
मलकापूरः क्षल्लक वादातून येथील मुकुंद नगरात झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत पोलिसांनी चौघाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. एकास अटक केली असून तिघे फरार आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कवळे आणी वानखेडे कुटुंबात वाद आहेत.यासंदर्भात कुसुम गोपाळ कवळे रा मुकुंद नगर यांनी पोलिसात दाखल तक्रारीत नमूद केले की सोमवारी रात्री सागर वानखेडे ,आकाश वानखेडे,पिंटू वानखेडे, शंकर दांडगे असे चार जण तलवारी व लोखंडी पाईप घेवून त्यांच्या घरी आले. विचारणा करण्यासाठी विनोद गोपाळ कवळे बाहेर पडला असता त्याला घरात ढकलून मारहाण केली.यात तलवारीचा वार बसल्याने गोपाळ कवळेचा उजवा कान तुटून पडला. इतरांना देखील जखमा झाल्या.
याप्रकरणी जखमी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. शहर पोलिसांनी चौघाविरूध्द अपराध नं.२५१/१९ कलम ३२६,३२४,३२३,५०४,४५२,३४ इतर कलम ६(२५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चौघाआरोपैकी पिंटू वानखेडे याला अटक केली आहे तर इतर तीन जण फरार आहेत. तपास सपोनि पवार करीत आहेत.(तालुका प्रतीनीधी)