‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात मलकापुरात ‘रास्ता रोको’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:25 IST2018-01-25T00:24:33+5:302018-01-25T00:25:06+5:30

मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला. 

Malkapur 'Path Roko' against 'Padmavat' film! | ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात मलकापुरात ‘रास्ता रोको’!

‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात मलकापुरात ‘रास्ता रोको’!

ठळक मुद्देआंदोलन : करणी सेना संतप्त

मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला. 
पद्मावत या चित्रपटात हिंदू धर्मातील महान वीरांगणा राणी पद्मावती यांचा गौरवशाली इतिहास व हिंदू परंपरेबद्दल हीन दर्जाची दृश्ये व संवाद चित्रित केले आहेत. ही बाब निषेधार्ह असून, हा चित्रपट कुठेच प्रदर्शित होऊ नये, या मागणीस्तव करणी सेनेने बसस्थानक ते बुलडाणा रोड मार्गे तहसील चौकात धडक देत रास्ता रोको केला. या आंदोलनात करणी सेनेचे गोपालसिंह राजपूत, गोरक्षा जिल्हा प्रमुख मोहनसिंह राजपूत, विहिपचे श्रीकृष्ण तायडे, बजरंग दलाचे दीपक कपले, राजपूत करणी सेनेचे अतुलसिंह राजपूत, संदीपसिंह राजपूत, पप्पूसिंह ठाकूर, संग्रामसिंह राजपूत, प्रतीकसिंह राजपूत गोलू राजपूत, प्रवीण राजपूत, पवन गरुड, सचिन सुरंगे, आशिष पाटील, करण राजपूत, पवन राजपूत, अमोल राजपूत, विजू खांबरे यासह हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. 

Web Title: Malkapur 'Path Roko' against 'Padmavat' film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.