मल्लिकार्जुन मंदिर: भाविकांचे श्रद्धास्थान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:05 AM2017-08-14T00:05:33+5:302017-08-14T00:05:52+5:30

देऊळगाव कुंडपाळ : जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील हेमाडपंती मंदिराच्या धर्तीवर कोरीव शिलालेखाने समृद्ध व प्राचीनकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले पार्डा दराडे येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर ऐन श्रावणातल्या सोमवारी भक्तांच्या मांदियाळीत फुलून जात आहे. परिसरातील असंख्य श्रद्धाळू भक्त मोठय़ा भक्तिभावाने महादेव शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. हेमाडपंती असे हे शिवालय शिवमंदिर पर्यटकांचेही आकर्षण बनले आहे.

Mallikarjuna Temple: Shrine of the devotees! | मल्लिकार्जुन मंदिर: भाविकांचे श्रद्धास्थान!

मल्लिकार्जुन मंदिर: भाविकांचे श्रद्धास्थान!

Next
ठळक मुद्देपार्डा दराडे येथील हेमाडपंती मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव कुंडपाळ : जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील हेमाडपंती मंदिराच्या धर्तीवर कोरीव शिलालेखाने समृद्ध व प्राचीनकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले पार्डा दराडे येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर ऐन श्रावणातल्या सोमवारी भक्तांच्या मांदियाळीत फुलून जात आहे. परिसरातील असंख्य श्रद्धाळू भक्त मोठय़ा भक्तिभावाने महादेव शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. हेमाडपंती असे हे शिवालय शिवमंदिर पर्यटकांचेही आकर्षण बनले आहे.
पूर्वाभिमुख व वृक्षवल्लीच्या सानिध्यातील या शिवमंदिराचा मध्ययुगीन काळात कृष्णदेवराय यांनी जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. मंदिराचे काम पूर्णत: कोरीव दगडांनी केलेले आहे. मंदिराला तीन दरवाजे असून, मुख्य गाभार्‍यात ‘शिव पिंड’ आहे. भाविकभक्त आदराने ‘मल्लिकार्जुन’ असे म्हणतात व ते जागृत देवस्थान असल्याने हजारो भाविकांची दर्शनासाठी तेथे वर्दळ असते. मंदिराशेजारी विहीर असून, तीही कोरीव दगडांनी बांधलेली आहे. मंदिरासमोर शिलास्तंभ असून त्यावर नागदेवता कोरलेली आहे. समोरच नंदीही आहे. श्रावण महिन्यात लोणारच्या विरज धारेचे पाणी आणून  भक्तगण महादेवाचा अभिषेक करतात. महाशिवरात्री, आमली बारस एकादशीला दर्शनासाठी येणार्‍या भक्तांमुळे येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिराचे पुजारी लक्ष्मण गिरी महाराज मंदिराचे व्यवस्थापन, देखभाल व स्वच्छता व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. पार्डा दराडे ग्रामस्थही त्यांच्या कार्यात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सामाजिक सलोखा प्रस्थापित करतात. 
मंदिराचे महत्त्व तीर्थक्षेत्र आणि पर्यटकाचा केंद्रबिंदू व इतिहास संशोधकाचे केंद्रस्थान असलेल्या शिवालयास आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी विशेष निधी देऊन विकास घडवून आणला आहे. युवा कार्यकर्ते रामकिसन दराडे, गणेशराव दराडे, लक्ष्मण गिरी महाराज, बबन जायभाये यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील, मंदिर विकासासाठी सेवारत आहेत; मात्र शासनाकडून दुर्लक्षित      असलेले हेमाडपंती शिवमंदिराची पर्यटन क्षेत्र विकास आराखड्यात समावेशाची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

Web Title: Mallikarjuna Temple: Shrine of the devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.