फेसबुक अकाउंटवरून महिलेची बदनामी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:55+5:302021-06-25T04:24:55+5:30
बुलडाणा : शेगाव शहरातील एका महिलेची फेसबुक अकाउंटवरून बदनामी करणाऱ्या आराेपीस सायबर सेलने नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे़ ...
बुलडाणा : शेगाव शहरातील एका महिलेची फेसबुक अकाउंटवरून बदनामी करणाऱ्या आराेपीस सायबर सेलने नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे़ तात्याराव पिराजी वाघमारे रा. मंगलसांगवी, ता. कंधार, जि. नांदेड असे आराेपीचे नाव आहे़
शेगाव शहरातील एका महिलेने पतीच्या फेसबुक अकाउंटवर मकरसंक्रांती सणासाठी काढलेले फाेटाे पाठवले हाेते़ महिलेने पाठवलेल्या फाेटाेखाली अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी करून नग्न व्हिडीओ व॑ आक्षेपार्ह फोटो महिलेचे पतीच्या फेसबुक अकाउंटवर अज्ञात आराेपीने मॅसेंजरव्दारे पाठविले हाेते. या प्रकरणी महिलेने १६ एप्रिल २०२१ राेजी तक्रार दाखल केली हाेती़ या प्रकरणी शेगाव पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सायबर पोलीस स्टेशन बुलडाणाकडे वर्ग करण्यात आला हाेता़. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अश्लील फोटो पाठविणाऱ्या तात्याराव पिराजी वाघमारे याचा शाेध घेतला़ तसेच पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार ज्ञानेश नांगरे, पवन मखमले, योगेश सरोदे, चापोकॉं राजदीप वानखेडे यांनी आराेपीचे लाेकेशन शाेधून अटक केली़ सोशल मीडियावरून महिला व तरुणींची बदनामी झाल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करावी, असे आवाहन ठाणेदार प्रदीप ठाकूर यांनी केले आहे़