ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:06 PM2019-02-03T13:06:54+5:302019-02-03T13:07:03+5:30
टेंभूर्णा ता. खामगाव : शहराकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत अकोला येथील मोठी उमरी भागातील रहिवाशी निवृत्ती नारायण भोपळे हे जागिच ठार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभूर्णा ता. खामगाव : शहराकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत अकोला येथील मोठी उमरी भागातील रहिवाशी निवृत्ती नारायण भोपळे हे जागिच ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णा फाट्यावर घडली.
अकोला येथील मोठी उमरीतील रहीवाशी निवृत्ती नारायण भोपळे (वय अंदाजे ५१) हे खामगाव शहरातील काम आटोपून अकोलाकडे निघाले होते. दरम्यान त्यांच्या एम.एच. ३०- ए.एल. ३६७४ क्रमांकांच्या मोटारसायकलला समोरून येणाºया भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात निवृत्ती भोपळे हे जागिच ठार झाले. अपघात झाल्याची माहिती मिळताच टेंभूर्णा येथील नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत निवृत्ती भोपळे यांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी नेहमीच अपघात होत असल्याची माहिती गावकºयांनी दिली. यापूर्वी सुद्धा टेंभूर्णा फाट्यावर गतिरोधक तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी रेटून धरली होती. मात्र पोलिसांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक प्रभावित झाली होती. (वार्ताहर)