अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास दहा वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:23 AM2020-11-08T11:23:32+5:302020-11-08T11:25:55+5:30

Buldhana Crime News, 10 years in prison विजय उर्फ गब्रू कैलास करोसिया यास दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

A man from Madhya Pradesh has been sentenced to 10 years in prison for abusing a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास दहा वर्षे कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास दहा वर्षे कारावास

Next
ठळक मुद्देरायपूर पोलिस स्टेशनअंतर्गतच्या अल्पवयीन मुलीसंदर्भात हा प्रकार घडला होता.तीन ते चार महिन्यांतर पीडिता ही आरोपी विजय उर्फ गब्रु कैलास करोसिया याच्याकडे होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मध्यप्रदेशात तिच्यावर जवळपास तीन ते चार महिने अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणा न्यायालयाने आरोपी विजय उर्फ गब्रू कैलास करोसिया यास दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बुलडाणा येथील जिल्हा सह न्यायाधिश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी. एस. महाजन यांनी हा निकाल दिला.
रायपूर पोलिस स्टेशनअंतर्गतच्या अल्पवयीन मुलीसंदर्भात हा प्रकार घडला होता. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १ एप्रिल २०१९ रोजी सकाळी हातपंपावर पाणी आणण्यासाठी जाते म्हणून घरून निघाली होती. दरम्यान बराच कालावधी झाला तरी ती परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी परिसरात तिचा शोध केला. मात्र ती सापडली नाही. प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी रायपूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर जवळपास तीन ते चार महिन्यांतर पीडिता ही आरोपी विजय उर्फ गब्रु कैलास करोसिया याच्याकडे मध्यप्रदेशात असल्याची माहिती पीडित मुलीच्या वडीलांना मिळाली. मध्यप्रदेशातील पिपलानी पोलिस ठाण्याच्य हद्दीतून त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येवून सुनावणी झाली. त्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडिता, तक्रारकर्ते, आदिवासी समाजाचे त्यावेळचे अध्यक्ष संदीप बरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. निवृत्ती देवकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. 
 पप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी. एस. महाजन यांनी आरोपी विजय उर्फ गब्रू कैलास करोसिया याला दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. अन्य कलमानुसारही काही शिक्षा सुनावण्यात आल्या असून त्या आरोपीला एकत्र भोगावयाच्या आहेत. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशीही तरतूद निकालात केली आहे.
या प्रकरणात वादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू सक्षमपणे मांडली. त्यांना कोर्ट पैरवी एएसआय  सुरेश मोतीराम लोखंडे (रायपूर) यांनी सहकार्य केले.

Web Title: A man from Madhya Pradesh has been sentenced to 10 years in prison for abusing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.