मनाेज जरांगे पाटलांची लेक बुलढाण्यात दाखल; मराठा समाजाच्या मोर्च्याला संबोधित करणार

By संदीप वानखेडे | Published: September 13, 2023 01:07 PM2023-09-13T13:07:56+5:302023-09-13T13:08:10+5:30

बुलढाण्यात सकल मराठा समाज बांधवांकडून मराठा क्रांती मोर्चाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे.

Manage Jarange Patal's daughter entered Buldhana; He will address the march of the Maratha community | मनाेज जरांगे पाटलांची लेक बुलढाण्यात दाखल; मराठा समाजाच्या मोर्च्याला संबोधित करणार

मनाेज जरांगे पाटलांची लेक बुलढाण्यात दाखल; मराठा समाजाच्या मोर्च्याला संबोधित करणार

googlenewsNext

बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून उपाेषण करणारे आंतरवाली सराटी गावातील मनाेज जरांगे पाटील यांची मुलगी बुलढाणा येथील समाज बांधवांच्या माेर्चाला संबाेधीत करण्यासाठी शहरात दाखल झाली आहे.

बुलढाण्यात सकल मराठा समाज बांधवांकडून मराठा क्रांती मोर्चाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे. या मोर्चात मराठा समाजातील मुली व महिला यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.  दरम्यान या मोर्चासाठी जरांगे पाटील यांचे कुटुंब येणार असल्याची माहिती ही देण्यात आली होती. यानुसार जरांगे पाटलांची लेक बुलढाण्यातील मोर्चा करिता अंतरवाली सराटी येथून रवाना झाली हाेती. ती इयत्ता आठवीतील विद्यार्थी आहे. दुपारी  वाजता ती बुलढाण्यात दाखल झाली आहे.

Web Title: Manage Jarange Patal's daughter entered Buldhana; He will address the march of the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.