इसोली येथे मानव विकास मिशनची बस सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:17 PM2017-08-23T23:17:11+5:302017-08-23T23:17:19+5:30

इसोली : येथील उर्दू या शिक्षणाचे माध्यम १ ते ४ वर्ग असल्याने पुढील शिक्षणासाठी अमडापूर येथील बशेरिया उर्दू शाळा महाविद्यालयामध्ये इसोली येथील ५२ विद्यार्थिनी व सात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात; मात्र त्यांची जाण्या-येण्याची सोय संस्थेने केली नसल्याने अखेर इसोली येथील समाधान सुपेकरसह पालकांनी या विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनची बस सुरू करून मुला-मुलींना होणारा त्रास थांबविला.

Manav Vikas Mission's bus started in Isoli! | इसोली येथे मानव विकास मिशनची बस सुरू!

इसोली येथे मानव विकास मिशनची बस सुरू!

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थिनींची हेळसांड थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
इसोली : येथील उर्दू या शिक्षणाचे माध्यम १ ते ४ वर्ग असल्याने पुढील शिक्षणासाठी अमडापूर येथील बशेरिया उर्दू शाळा महाविद्यालयामध्ये इसोली येथील ५२ विद्यार्थिनी व सात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात; मात्र त्यांची जाण्या-येण्याची सोय संस्थेने केली नसल्याने अखेर इसोली येथील समाधान सुपेकरसह पालकांनी या विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनची बस सुरू करून मुला-मुलींना होणारा त्रास थांबविला.
चिखली तालुक्यातील ७ ते ८ हजार लोकवस्ती असलेल्या अमडापूर येथे उर्दू माध्यमाचे १ ते ४ पर्यंत वर्ग असल्याने इसोली येथून अमडापूरला शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या जास्त आहे. सदर मुलीची येण्या-जाण्याची हेळसांड होत असल्याचे पाहून समाधान सुपेकर, पं.स. सदस्य  कोकिळा खपके, मोबीनभाई माजी सरपंच, सरपंच मंर्दा विजय गीते यांनी चिखली आगार व्यवस्थापक यांच्याकडे मानव मिशन अंतर्गत बस सुरू व्हावी म्हणून गेल्या एक महिन्यापासून प्रस्ताव दाखल करूनही मानव विकास मिशनची बस सुरू व्हायला तयार नव्हती; मात्र येथील समाधान सुपेकर चमूने आमदार राहुल बोंद्रे, गटशिक्षणाधिकारी राजपूत, विस्तार अधिकारी शिंदे, केंद्रप्रमुख धारे या शासन स्तरावर काम पाहणार्‍या राजकीय व अधिकारी यांना विद्यार्थिनींची होत असलेली हेळसांड कथन करून अखेर २२ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता मानव विकास मिशनची बस सुरू झाली. गावात बस आल्याने चालक-वाहक यांचा ग्रामस्थांच्यावतीने समाधान सुपेकर, पं.स. सदस्य कोकिळा खपके, मोबीनभाई, सुरेंद्र खपके यांनी सत्कार केला, तर आमच्या मुलींना शिक्षणासाठी त्रास होणार नाही, तर मुलींना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, ‘बेटी पढाओ, बेटी जगाओ’साठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
यावेळी शे.कडूलाला, इल्यासलाला नेपारी, कय्युमशाह, ऐनास टेलर, शे.युनूस, शे.हारुण, अँड. सादीक, डॉ.रईस, रसीदशाह, उपसरपंच वसंता घोरपडे, श्याम सावंत, प्रकाश येवले तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Web Title: Manav Vikas Mission's bus started in Isoli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.