मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 05:01 PM2021-03-16T17:01:05+5:302021-03-16T17:01:13+5:30

ही कारवाई सोमवारी उशीरा रात्री खामगाव-शेगाव रोडवरील वरखेड फाट्यावर करण्यात आली.

Mandul catches two snake smugglers! | मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले!

मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मांडूळ सापाची तस्करी करणाºया दोघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी उशीरा रात्री खामगाव-शेगाव रोडवरील वरखेड फाट्यावर करण्यात आली.

खामगाव शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक गस्त घालीत असताना पथकास खामगाव-शेगाव मार्गावरील वरखेड फाटा परिसरात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोस्टेचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांच्यासह गुन्हे शोध पथकाने सापळा रचून खामगाव-शेगाव मार्गावरील वरखेड फाटयावर दोघेजण मांडूळ जातीचा साप बाळगताना दिसून आले. यावेळी पोलिसांनी शेख इरफान शेख बाबू (३०) रा. अहमदाबाद (गुजरात) ह.मु, वरखेड ता.शेगाव व शेख नासीर शेख गफुर(३९) रा.वरखेड ता.शेगाव यांना ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक विभाग खामगाव यांच्या स्वाधीन करण्यात आले.  ही कारवाई पोउपनि गौरव सराग, पोहेका गजानन बोरसे, नापोका राजेंद्र टेकाळे, नापोका सुरज राठोड, पोका जितेश हिवाळे, पोका दिपक राठोड, पोका अमरदिपसिंह ठाकूर, पोका प्रफुल्ल टेकाळे यांनी केली.

Web Title: Mandul catches two snake smugglers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.