आंब्याची सुगी अन्‌ जावईबापूना रसाचा पाहुणचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:14+5:302021-05-29T04:26:14+5:30

फळांचा राजा असलेल्या यंदा आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. आंबा, त्याचा रस आबालवृद्धांना आवडतो. बुलडाणा जिल्ह्यासह परिसरात गावरान, ...

Mango harvest and Jawaibapuna juice are not hospitable | आंब्याची सुगी अन्‌ जावईबापूना रसाचा पाहुणचार नाही

आंब्याची सुगी अन्‌ जावईबापूना रसाचा पाहुणचार नाही

googlenewsNext

फळांचा राजा असलेल्या यंदा आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. आंबा, त्याचा रस आबालवृद्धांना आवडतो. बुलडाणा जिल्ह्यासह परिसरात गावरान, केशर, आंब्याचे उत्पादन आहे. गावरान ५० ते ६० रुपये तर केशर, लालबाग ७० ते ८० किलो दराने विक्री होत आहे. यंदा सर्वच ठिकाणी आंब्याचे उत्पादन अधिक झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन आहे. बसेस बंद आहेत. त्यामुळे रेलचेल बंद झाली आहे. आंब्याचा हंगामात जावईबापूंना दरवर्षी रस-पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून बोलाविले जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे जावईबापू रस- पोळीच्या निमंत्रणापासून वंचित राहत आहेत. यंदा हा कार्यक्रम घरीच घेऊ, असे जावईबापू म्हणत आहेत. सण, पाहुणचारालाही नातेवाईकांना मुकावे लागले.

कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून शाळा बंद असून बच्चे कंपनी घरातच आहेत तसेच परीक्षाही नाहीत. उन्हाळा सुरू झाला की, लहान मुलांमध्येही मामाच्या गावी जाण्यासाठी आतुरता असते. मात्र, यंदा मुले मामाच्या गावाला जाण्यास मुकली असल्याने त्यांचाही हिरमोड झाला आहे.

उन्हाळ्यात रस- पोळीची प्रथा

कोरोनामुळे कुठेही जाता येत नाही. घरीही कोणाला येता येत नाही. अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाला सुरुवात होते. दरवर्षी उन्हाळ्यात जावयाला बोलावून रस- पोळीचे भोजन देण्याची प्रथा आहे. परंतु, यंदा कोरोनामुळे त्यावर विरजण पडले आहे.

Web Title: Mango harvest and Jawaibapuna juice are not hospitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.