प्रतिबंधीत मांगूर मासळीचा ट्रक पकडला

By सदानंद सिरसाट | Published: July 28, 2023 07:56 PM2023-07-28T19:56:05+5:302023-07-28T19:56:39+5:30

शेगाव पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात मासोळ्या केल्या नष्ट.

mangur fish truck caught in the ban | प्रतिबंधीत मांगूर मासळीचा ट्रक पकडला

प्रतिबंधीत मांगूर मासळीचा ट्रक पकडला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव : पर्यावरण तसेच मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने विक्री, साठवणीसाठी प्रतिबंधित असलेल्या मांगूर जातीच्या तीन टन मासळीची वाहतूक करणारा ट्रक अकोट-शेगाव रोडवर पोलिसांनी पकडला. त्यामधील मासळी गौलखेड रोडवरील शेगाव पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात खड्डा खोदून त्यामध्ये नष्ट करण्यात आली. ही कारवाई पोलिस विभागाने केली.

शासनाने बंदी घातलेल्या व मानव जीवनासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या मांगूर जातीच्या जिवंत मासळ्याची वाहतूक ट्रकद्वारे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर व त्यांच्या पथकाने शेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत अकोट रोडवर सापळा रचला. यावेळी मिनी मालवाहू ट्रक क्रमांक एमएच-४०, सीडी-९०३० क्रमांकाचा संशयास्पद ट्रक थांबवून शेगाव पोलिस स्टेशनमध्ये आणला.

चौकशी केली असता, मांगूर जातीची मासळी आढळून आली. या मासळीची विक्री तसेच साठवण ठेवण्यास व वाहतूक करण्यास केंद्र शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे मासोळी कोणत्या प्रकारची आहे, ही तपासणी करण्यासाठी बुलढाणा येथे मत्स्य विभागाकडे पाठविण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी ट्रक जप्त केला. शुक्रवारी सकाळी यामधील मासळ्या गौलखेड रोडवर असलेल्या शेगाव नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर वीस फूट खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: mangur fish truck caught in the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shegaonशेगाव