समस्यांवर मात करीत घडी बसविणार- मनोहर अकोटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 03:50 PM2021-01-02T15:50:17+5:302021-01-02T15:50:24+5:30
Khamgaon News खामगाव नगर पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्याशी साधलेला संवाद.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव शहरातील विविध समस्यांवर मात करीत खामगाव पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची घडी बसविण्यावर आपला भर राहणार आहे. खामगाव नगर पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्याशी साधलेला संवाद.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पालिकेतील समस्यांबाबत काय सांगाल?
बुलडाणा जिल्यातील सर्वात मोठ्या आणि विकसनशील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रं नुकतीच घेतली आहेत. शहरातील प्रमुख समस्यांचा आढावा सुरूवातीलाच घेतला जात आहे. सुरूवातीला लहान आणि सहज सुटणाऱ्या समस्यांना सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे समस्या अजिबात मोठ्या नाहीत. मात्र, विविध समस्यांवर मात करीत खामगाव पालिकेची आर्थिक घडी बसविण्यासाठी आपले प्राधान्य राहील.
खामगाव शहरातील अतिक्रमणाबाबत आपली भूमिका काय?
शहरातील अतिक्रमण आणि विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून पालिकेतील सर्वच विभाग प्रमुखांद्वारे आढावा घेतल्या जात आहे. अतिक्रमण निमूर्लनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, पोलीस आणि महसूल प्रशासनाद्वारे संयुक्त मोहीम राबविण्यासंदर्भात निर्णय विचाराधीन आहे.
जलसाठ्यांमध्ये मुबलक साठा असतानाही शहरात पाणी टंचाई बाबत काय सांगाल?
सामान्य नागरिकांपर्यंत तात्काळ पाणी पोहोचविण्यासाठीच आपले पहीले प्राधान्य आहे. त्याअनुषंगाने शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजना तात्काळ मार्गी लावण्यासाठी रूजू झाल्याच्या पहील्या दिवसांपासूनच आपण कामाला लागलो आहे. त्यामुळेच पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून पालिका प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे.
खामगाव शहरातील नागरिकांकडून आपल्या अपेक्षा काय?
शहरातील समस्या सोडविण्यासाठी सुरूवातीपासूनच नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसादाची आपली एकमेव अपेक्षा आहे. या शिवाय मालमत्ता कर, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वंसुधरा अभियानासोबतच पालिका प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा. प्लास्टिक निमूर्लन मोहीमेसोबत ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा उचल प्रक्रीया गतीमान करण्यासाठी सहकार्य करावे.