मोताळ्याचे आराध्य दैवत मानाचा गणपती

By admin | Published: September 7, 2014 12:11 AM2014-09-07T00:11:27+5:302014-09-07T00:11:27+5:30

मोताळा येथील मानाचा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

Mantala's idol goddess Ganapati | मोताळ्याचे आराध्य दैवत मानाचा गणपती

मोताळ्याचे आराध्य दैवत मानाचा गणपती

Next

मोताळा : तालुक्यातील एकमेव तथा शहरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेला प्रसिद्ध जुन्या गावातील मानाचा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथे दररोज भाविकांची गर्दी येथे दिसून येते. गणेश उत्सवानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कायक्रमांचे आयोजन व गाव जेवण देण्याची परंपरा गेल्या कि त्येक वर्षांंंपासून येथे जोपासल्या जात आहे. सुमारे ६२ वर्षांंंपूर्वी जुन्या गावातील नागरिकांनी संकल्प करीत एकत्र येऊन ग्रामपंचायतजवळ गणेशाची स् थापना केली होती. तेव्हापासून मानाचा गणपती म्हणून या गणेशाची ख्याती आहे. पूर्वी मंदिराचे स्वरूप टिनपत्र्याचे होते. त्यामध्ये सुरुवातीला सिमेंट पासून बनवलेली गणेश मूर्तीची स्थापना केल्याचे नागरिक सांगातात. नंतर १९८५ मध्ये शंकर भावसार, आत्माराम निकम व इतर भक्तांच्या पुढाकाराने लोक वर्गणीतून गणेश मंदिराची उभारणी केल्या गेली. नंतर राजस्थान येथून सुमारे साडेचार फुटाच्या उंचीची आकर्षक व सुंदर अशी गणेश मूर्ती आणून १९९२ मध्ये प्राणप्रतिष्ठा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. कालांतरांने भाविक भक्तांचा आदर करून २00२ मध्ये लोक वर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. प्रारंभी साधे असलेले हे गणेश मंदिर आज रोजी भव्य व सुंदर दिसत असल्यामुळे गणेश भक्तांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे शहर परिसरातील भाविक भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येते. मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी शहरात पाच ठिकाणी गणेश मंडळे स्थापन व्हायची. त्यानंतर २00३ पासून या मंदिरालगतच सार्वजनिक गणेश मंडळची स्थापना करून ह्यएक गाव एक गणपतीह्णची संकल्पना शहरात राबवल्या जात आहे. प्रतिवर्षी गणेश उत्सव, चतुर्थी, एकादशी व महाशिवरात्री प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन गावकरी मंडळीकडून सार्वजनिक स्वरूपात या ठिकाणी के ल्या जाते. या मानाच्या गणपतीची ख्याती संपूर्ण तालुक्यात पसरली आहे .

Web Title: Mantala's idol goddess Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.