रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले.
By विवेक चांदुरकर | Published: July 8, 2024 02:10 PM2024-07-08T14:10:27+5:302024-07-08T14:11:07+5:30
रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले.
पोरज : खामगाव तालुक्यातील रोहणा, पोरज, निमकवळा, तांदुळवाडी परिसरातील नागरिकांना जोरदार पावसाचा तडाखा बसला. या भागातील अनेकांच्या घरांची पडझड झाली असून, घरातील जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच जनावरे वाहून गेल्याने पशूपालकांचे नुकसान झाले आहे.
रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले. रोहणा येथील प्रकाश काशीराम बोचरे यांचे ८ क्विंटल गहु, ५० बॅग सिमेंट, १० बॅग सासायनिक खताचे नुकसान झाले. अमोल समधान सावंग यांचे घर पडले. त्यांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. तसेच प्रमिला अरुण शेजोळे, प्रकाश सिताराम सावंग, भीमराव सिताराम सावंग यांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याने दैनंदिन उपयाेगी वस्तुंचे नुकसान झाले. सुभाष जानू सावंग, रणजीत सावंग, मारुती सावंग, अनिल सावंग, मिलिंद उत्तम सावंग यांच्या घरात पाणी शिरले. गावालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ डीपीचे नुकसान झाले आहे.
शेतीउपयोगी साहित्य गेले वाहून, पिकांचे नुकसान
रोहणा येथील उत्तम शालिग्राम सावंग, संघपाल उत्तम सावंग यांचे शेतीचे अवजारे डवरे, वखर, तिफन पुरात वाहून गेले. शत्रुघ्न तुळशीराम सावंग यांचे शेतीतील अवजारे टिलर, रामेश्वर घोंगे यांच्या घरातील गहू ज्वारीचे नुकसान झाले. गोकुळ शेषराव सावंग यांच्या घरात पाणी शिरून खाण्यापिण्याचे वस्तु सामान आणि शेती आवश्यक अवजारे पाण्यात वाहून गेले. तसेच गावालगत असलेले शेषराव बळीराम सावंग यांच्या शेतात पाणी साचले असून पिकाचे नुकसान झाले आहे. सुमनबाई राजाराम नाईक यांच्या शेतात पाणी साचल्यााने पिकांचे नुकसान झाले.