अनेक इच्छुकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:08 AM2017-09-11T01:08:07+5:302017-09-11T01:08:27+5:30

ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.

Many wanting to get the post of sarpanch! | अनेक इच्छुकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

अनेक इच्छुकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

Next
ठळक मुद्देअटीतटीची लढत होणार खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले

राजू पठाण । 
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर: ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.
राजकीयदृष्ट्या सर्वांच्या नजरा सुलतानपूर गावाच्या सत्ता  केंद्राकडे लागून असतात. तर सुलतानपूरचे सरपंचपद हे  मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने अनेक प्रस्तापित  इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे  मागासवर्गीयमधील अनेक चेहरे बाशिंग बांधून आपली  योग्यता पटवून सांगताना दिसत आहे. यावेळेस सुलतानपूरची  वार्ड संख्या सहा झाली असून, सदस्य संख्या १७ झाली  आहे. त्यामध्ये ९ महिला तर ८ पुरुष असणार आहेत. त्यामुळे  अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद दाखवून महिलांसह  निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अर्ज  भरण्यासाठी १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याने  अनेकांनी मतदार याद्या आणून मतदारांच्या भेटीसाठी सुरू  केल्या आहेत; मात्र पूर्वीच्या वार्डाची तोडफोड होऊन येथे  वार्ड रचना तयार केली गेली असल्याने या वेळेसच्या  निवडणुकीत मागील अंदाज निकामी ठरणार आहेत. त्यामुळे  विजयाचे गणित अवघड असल्याचे बोलल्या जात आहे.
यावेळी युवक वर्ग मोठय़ा ताकदीने ग्रामपंचायत सत्ताकारणा त सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जाते. तर  गावातील ज्येष्ठ पुढारी पार्टीचालकसुद्धा नव्या  परंतु  प्रामाणिक व होतकरू चेहर्‍याचा शोध घेत आहेत. सरपंच  पद हे जनतेतून निवडल्या जाणार असल्याने जो-तो आपल्या  गटाचा सरपंच कसा होईल, यासाठी तयारी करीत आहे. म तदार मात्र दिवसेंदिवस चांगलाच हुशार, विकासाची जाण,  सुशिक्षित, सुज्ञ उमेदवारालाच आपली पसंती देतील व पार्टी  नेतेसुद्धा अशाच उमेदवाराला आपले सर्मथन देतील, एवढे  मात्र खरे!

जुन्यांना नारळ, तर नव्यांना संधी
या अगोदर ग्रामपंचायत सत्ताकारणात ज्यांनी पदे भोगली,  असे काही चेहरेसुद्धा या वेळेस नव्या ताकदीने मतदारांच्या  भेटीगाठी घेताना दिसत आहेत. सत्ता भोगूनसुद्धा त्यांची अ पेक्षा मावळली नसली तरी मतदारराजा अशा जुन्या चेहर्‍यांना  मात्र ‘नारळ’ देत नाकारणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Many wanting to get the post of sarpanch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.