Maratha Kranti Morcha : मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:17 PM2018-07-24T15:17:40+5:302018-07-24T15:20:54+5:30
मलकापूर: आरक्षणाच्या मुद्यावर मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाची गोदावरी नदीत आरक्षणासाठी बलीदानाची माहती कळताच येथील समाजाने निर्धार केला.
मलकापूर: आरक्षणाच्या मुद्यावर मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाची गोदावरी नदीत आरक्षणासाठी बलीदानाची माहती कळताच येथील समाजाने निर्धार केला. काकासाहेब, तुमचं बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशा आशयाचा संकल्प शिवपुतळ्याच्या साक्षीत केला. विदर्भाच्या प्रवेश द्वारी मलकापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्यावरूनअक्षरश: रान पेटविले. चिंब भिजून पावसात तहसील कार्यालयात चोख पोलीस बंदोबस्तात ठिय्या आंदोलन केले. त्यात सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी हजर होते. दुपारी आंदोलनकर्त्यांना काकासाहेब शिंदे या तरूणाने आरक्षणाच्या मुद्यावरून गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्याची माहिती कळली. त्यावर ठिय्या आंदोलन आटोपल्यावर मलकापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी नगरस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्थानबध्द होवून दिवंगत काकासाहेब शिंदे या तरूणाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी मनोगतातून प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. शेवटी काकासाहेब तुमचं बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा निर्धार मलकापूरातील सकल मराठा समाजबांधवांनी यावेळी केला. (तालुका प्रतिनिधी)
सकल मराठा समाजाची नांदुरा बंदची हाक
नांदुरा: सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी संपुर्ण राज्यात विविध आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजता नांदुरा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील महामार्गावरील मोठ्या हनूमान मुर्तीपासून शहरातील विविध रस्त्यांवर शेकडोच्या संख्येने मार्गक्रमण करीत शहर बंदची हाक देण्यात आली. यामुळे संपुर्ण नांदुरा शहरातील दुकाने बंद करण्यात आली. नागरीकांनी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली. नांदुºयामध्ये ग्रामीण भागातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने दाखल झाला. मंगळवारी दिवसभर संपुर्ण शहर बंद होते. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.