'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणेने मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात; बुलढाण्यात मराठा समाज बांधवांचा एल्गार
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 13, 2023 12:49 PM2023-09-13T12:49:11+5:302023-09-13T12:50:03+5:30
बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार मराठा समाज बांधवांनी एल्गार पुकारला आहे.
बुलढाणा : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच जालना जिल्ह्यात आंदोलकांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ १३ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणेने मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात झाली आहे.
येथील जिजामाता प्रेक्षागार मराठा समाज बांधवांनी एल्गार पुकारला आहे. बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या प्रत्येक टोकावरून मराठा सामाज बांधव या मोर्चात सहभागी झाला आहे. जवळपास सात वर्षांनंतर पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुलढाण्यात मोर्चा काढण्यात येत आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवाची एकजूट या मोर्चातून समोर येत आहे.
बुलढाणा- बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या प्रत्येक टोकावरून मराठा सामाज बांधव या मोर्चात सहभागी झाला आहे. जवळपास सात वर्षांनंतर पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुलढाण्यात मोर्चा काढण्यात येत आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवाची एकजूट या मोर्चातून समोर येत आहे. pic.twitter.com/vBr2bylHul
— Lokmat (@lokmat) September 13, 2023
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील जरांगे पाटील यांची मुलीचाही या माेर्चात सहभाग आहे. बुलढाण्यात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणांनी बुलढाण्यातील संगम चौक परिसर दणाणून सोडला आहे. लवकरच हा मोर्चा जिल्हाभधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.