Maratha reservation : मेहकर येथील ३३ युवकांनी केले मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:16 PM2018-08-01T18:16:29+5:302018-08-01T18:17:48+5:30
मेहकर : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मेहकर येथील गेल्या तिन दिवसापासून मुंडण करून आंदोलन करण्यात येत आहे.
मेहकर : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मेहकर येथील गेल्या तिन दिवसापासून मुंडण करून आंदोलन करण्यात येत आहे. १ आॅगस्ट रोजी जवळपास ३३ युवकांनी मुंडण केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशी माहिती सकल मराठा समाज बांधवांनी दिली आहे. मेहकर शहरात ३० जुलै पासून सुरू करण्यात आलेल्या मुंडण आंदोलनाच्या तिसºया दिवशीही जिजाऊ चौकात ३३ लोकांनी मुंडण केले. मुंडण करणाºयांमध्ये भिका तायडे, शंकर बोबले , पंढरी मोरे, शुभम दुधाट, करण आव्हाळे, शैलेश देशमुख, प्रा.आशिष रहाटे, संजय शिंदे, किरण कानोडजे, महेश ठाकरे, राजु देशमुख, शंकर पवार, निखिल मानघाले, विनोद बोडखे, बाळु पाटील, सुनिल जाधव, ज्ञानेश्वर, देशमुख, सचिन जैजाळ, पंकज पवार आदींचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)