Maratha Reservation : मेहकर येथे ५० युवकांनी केले मुंडण; मुख्यमंत्र्यांना पाठविणार केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:58 PM2018-07-30T16:58:14+5:302018-07-30T16:59:15+5:30
मेहकर : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी ३० जुलै रोजी सकाळी जिजाऊ चौकात सामुहिकरित्या मुंडण आंदोलनाला सुरूवात करण्यात आली व मुंडण केलेल्या ५० युवकांचे केस हे पुष्पगुच्छासह मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यात सर्वत्र मराठा आरक्षाणाच्या मागणीवरून वातावरण तापलेले आहे. शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार पासून मुंडण आंदोलन सुरू करण्यात आले. असून दररोज ५० जणांचे मुंडण करून मुख्यमंत्र्यांना मुंडण केलेले केस पाठविण्यात येणार आहे. मुंडण करणाºयामध्ये सिध्देश्वर पवार, प्रा.विनोद पºहाड, जयचंद बाठीया, गजानन गारोळे, गणेश चैताने, अमोल देशमुख, सुमित इंगळे, प्रल्हाद भिसे, विनोद झाल्टे, राजु खंडागळे, जगदिश एरवंडे, गणेश जगताप, सागर पंचाळ, हरिदार शिकारे, शिवाजी गारोळे, अतुल शिंदे, गजानन सावंत, देवानंद पवार, राजेश धोटे, अविनाश देशमुख, विलास तनपुरे, दत्ता पुरी, धनंजय देशमुख, विवेक देशमुख, नितीन वैराळ, शुभम धांडे, किशोर देशमुख, योगेश कानोडजे, समाधान देशमुख, मोहन गाडेकर, विष्णु देशमुख, विजय काळे, मदन मानघाले, ज्ञानेश्वर नगरभोज, संदिप कानोडजे, प्रमोद आसोले, प्रदिप बाजड, गोपाल सवडतकर, जिवन खंडागळे, गणेश सिरसाट, नंदकिशोर वैराळ, धनंजय वैराळ आदींचा मुंडण केलेल्यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)