Maratha reservation : नांदुऱ्यात जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 04:50 PM2018-08-01T16:50:59+5:302018-08-01T16:52:53+5:30
बुधवारी नांदुरा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.
नांदुरा : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र सकल मराठा समाजातर्फे आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी बुधवारी नांदुरा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.
१ आॅगस्टरोजी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पन करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून नांदुरा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने अतिशय शांत व शिस्तबद्धरित्या पोलिस स्टेशन कड़े मार्गक्रमण करण्यात आले. संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी सकल मराठा समाजातील बांधवावर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. नांदुरा पोलिस स्टेशनसमोर सकल मराठा समाज बांधवांनी जेलभरो आंदोलन केले.
(प्रतिनिधी)