Maratha Reservation Protest : बुलडाण्यात आमदारांच्या घरासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:29 PM2018-08-03T12:29:35+5:302018-08-03T12:31:17+5:30
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले.
बुलडाणा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले. स्थानिक सुवर्ण नगरातील आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरासमोर सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने जवळपास १ तास धरणे देण्यात आले. यावेळी भजनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण त्वरित मिळण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आमदार साहेब चुप्पी खोलो, विधानसभा में कुछ तो बोलो’, अशा प्रकारे भजनाचा माध्यमातून आवाहन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या संदर्भातील निवेदन मृणालिनी हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारले. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तर ठाणेदार यु.के.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.