वसुलीची तक्रार केल्याने बाजार केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:09+5:302021-08-22T04:37:09+5:30
मलकापूर पांग्रा : येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याची दुकाने लावणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराने वसुली सुरू केली हाेती़ या कंत्राटदाराची ...
मलकापूर पांग्रा : येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याची दुकाने लावणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराने वसुली सुरू केली हाेती़ या कंत्राटदाराची तक्रार ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली असता हा बाजारच उठवण्यात आला़ त्यामुळे शेतकरी, व्यावसायिकांच्या मालाचे नुकसान झाले़
मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजारात १८ ऑगस्ट राेजी काही शेतकरी व दुकानदारांनी दुकाने लावली हाेती़ या दुकानदारांकडून ग्रामपंचायतीच्या कंत्राटदाराने कर वसुली सुरू केली़ याविषयी व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली हाेती़ ग्रामपंचायत प्रशासनाने कंत्राटदारावर कारवाई न करता किरकाेळ भाजीपाला विक्रीवर बंदी घालत आठवडी बाजार बंद केला़ त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांची दुकाने थेट बसस्थानकावर लावून रोडवर गर्दी केली़ तसेच यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हाेता़ मुख्य रस्त्यावर दुकाने लावण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने मनाई केली नाही़ या रस्त्यावर भाजी विक्रेते जीव मुठीत घेऊन दुकाने लावत आहेत़ तसेच जागा कमी असल्याने गर्दीही हाेत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडी बाजारात दुकाने लावण्यास परवानगी देण्याची मागणी हाेत आहे़
आठवडी बाजार सुरू करा
काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात कमी झाली आहे़ प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत; मात्र, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ज्यावर अवलंबून असते त्या आठवडी बाजारांना अजूनही मंजुरी दिलेली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन ग्रामीण भागात आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी हाेत आहे़