बाजार समिती विकासासाठी निधी देऊ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 07:39 PM2017-10-29T19:39:12+5:302017-10-29T19:44:17+5:30
बुलडाणा : नवीन कार्यकारीणीने बुलडाणा बाजार समितीमध्ये केलेले बदल आदर्श असून बाजार समितीच्या विकासासाठी निधी देण्यास आपले प्राधान्य राहील, असे आश्वासन कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नवीन कार्यकारीणीने बुलडाणा बाजार समितीमध्ये केलेले बदल आदर्श असून बाजार समितीच्या विकासासाठी निधी देण्यास आपले प्राधान्य राहील, असे आश्वासन कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.
बुलडाणा बाजार समितीची त्यांनी शुक्रवारी पाहणी केली. सोबतच विविध विकास कामांची माहिती जाणून घेतली. प्रारंभी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी त्यांचा शाळ, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, बाजार समिती उपसभापती गौतम बेगानी, संचालक नारायण सुसर, भाजप तालुकाध्यक्ष मोहन पवार, युवासेनेचे जिल्हा समन्वयक राजू मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, कृषीमंत्री फुंडकर यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीचा कायापालट, कृषीमाल ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या ३० हजार मेट्रीक टन क्षमतेच्या गोडावूनची व्यवस्था, पिण्याचे पाणी तथा शौचालय व्यवस्था आणि हमाल-मापार्यांसाठीच्या विमा योजनेचे कौतूक केले. शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करणाºया बाजार समितीला विकास निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती सुधाकर आघाव, बाजार समितीच्या सचिव वनिता साबळे, सहसचिव गोविंद दळवी, सुनील काळवाघे, दीपक चव्हाण, पी. जे. गारवे, गजानन व्यवहारे, जितेंद्र गवई, संतोष सनई, सिद्धराज पंधाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.