भाजीपाल्याची बाजारातील आवक घटली; कांद्याचे भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:05+5:302021-02-08T04:30:05+5:30
बुलडाणा : गत काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढलेले आहेत. तसेच कांद्याचे भाव ...
बुलडाणा : गत काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढलेले आहेत. तसेच कांद्याचे भाव दहा रुपयांनी वाढले आहेत.
पाण्याची पातळी कमी हाेत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी हाेत आहे. त्यामुळे दर रविवारच्या आठवडा बाजारात भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात वाढलेले हाेते. गत आठवड्यात ४० रुपये किलाेने विकल्या गेलेल्या कांद्याचे भाव ५० रुपयांवर पाेहोचले आहेत. फळांचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलही गेल्या आठवड्यात तुलनेत वाढल्याने सर्वसामान्यंना महागाईचा फटका बसणार आहे.
या आठवड्यात कांदा ४० रुपयांवर आला हाेता. तसेच हिरवी मिरची ४० रुपये किलाे, वांगी ३० रुपये किलो हाेती. या आठवड्यातही हाच भाव कायम आहे. आवक घटल्याने मेथी, पालकचे दर वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे भाव वाढले आहेत. साेयाबीन तेल पाच रुपयांनी कमी झाले आहे. तसेच शेंगदाना तेल आणि सूर्यफूल तेलाचे भाव गत आठवड्याएवढेच आहेत.
गत आठवड्यात साेयाबीन तेल १२० प्रतिकिलाे हाेते. या आठवड्यात भाव कमी हाेऊन ११५ रुपयांवर आले आहेत. तुरीचा हंगाम सुरू असला तरी डाळीचे भाव मात्र दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. तुरीची डाळ १०० रुपये किलाेप्रमाणे विकली जात आहे. येत्या काही दिवसात तूरडाळीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
द्राक्षांचे भाव घसरले
द्राक्षांची आवक सुरू झाल्यानंतर भाव २०० रुपयांवर गेले हाेते. या आठवड्यात द्राक्षांची आवक वाढल्याने भाव ४० ते ५० रुपयांनी कमी झाले आहेत. द्राक्ष सध्या १६० ते १५० रुपये प्रतिकिलाेने विकली जात आहेत. डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. गत आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपये किलोवर हाेते. ते कायम आहेत. पपई व संत्र्याच्या दरातही वाढ झाली आहे. गत आठवड्यापासून बाजारात टरबुजाची आवकही वाढली आहे. शेतकरी आपला माल ग्राहकांना विकत आहेत.
द्राक्ष बाजारात दाखल झाल्यानंतर भाव वाढलेले हाेते. या आठवड्यात द्राक्षांची आवक माेठ्या प्रमाणात वाढल्याने ४० ते ५० रुपयांनी कमी झाले आहेत. सफरचंद, माेसंबी व इतर फळेही महागली आहेत. टरबुजाची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत.
- अजीम बागवान, फळ विक्रेता
गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत. मिरचीचे भाव वाढलेलेच आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलाेने विकला जात आहे. - संताेष इंगळे, भाजी विक्रेता