पोळा सणानिमित्त लोणार शहरात बाजारपेठ सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:38 AM2021-09-05T04:38:24+5:302021-09-05T04:38:24+5:30
यावर्षी पाऊस चांगला झाला; परंतु कोरोनाचे सावट असल्याने शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कमी किमतीचे साहित्य खरेदी करण्याकडे भर देत ...
यावर्षी पाऊस चांगला झाला; परंतु कोरोनाचे सावट असल्याने शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कमी किमतीचे साहित्य खरेदी करण्याकडे भर देत आहे. त्यामुळे बाजारात कमी उलाढाल होत आहे. पूर्वी दोन बैलांसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च करणारा शेतकरी यंदा तीनशे ते पाचशे रुपये खर्च करून आपल्या बैलांना सजविणार आहे.
अशा आहेत साहित्याच्या किमती
गोंडे- १५० ते २०० रुपये, कपाळाची आरसी- १०० ते १५० रुपये, कवडी गेज- ९० ते १५० रुपये, येसन- ५० ते ६० रुपये, गोप मोरखी- ६० ते ८० रुपये, काचरे- ४० ते ६० रुपये, शेंदूर- ५० ते ६० रुपये, पितळी गेज पट्टा- ८०० ते १००० रुपये, पाठीवरची झूल- ६०० ते ८०० रुपये आहे. तरी देखील शेतकरी हा पैशांकडे न पाहता आपल्या बैलाला सजविण्यासाठी थोडेफार का होईना साहित्याची खरेदी करताना दिसत आहे.