विवाहाची नोटीस आता आॅनलाईन; नोंदणी कार्यालयात समक्ष जाण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:28 PM2018-07-27T12:28:01+5:302018-07-27T12:29:21+5:30
बुलडाणा : विशेष विवाह नोंदणीकरीता वर-वधूंना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे, ३० दिवसानंतर विवाह संपन्न करणे, या दोन कामासाठी जावे लागते.
बुलडाणा : विशेष विवाह नोंदणीकरीता वर-वधूंना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे, ३० दिवसानंतर विवाह संपन्न करणे, या दोन कामासाठी जावे लागते. यापैकी नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली आहे. वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. १ आॅगस्टपासून आॅनलाईन नोटीस देणे वधू-वरासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेष विवाह कायदा १९५४ मधील तरतुदीनुसार विवाह संपन्न करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील एक दुय्यम निबंधकास त्या जिल्ह्यासाठी एक विवाह अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. कायद्यानुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छूक वर-वधू यांनी आपल्या विवाहाची नियोजीत नोटीस संबधित जिल्ह्याचे विवाह अधिकाºयांना सादर करावी लागते व नोटीस शुल्क भरावे लागते. संबंधित वर-वधु अटींची पुर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी सदर नोटीस स्वीकारतात व त्याची प्रत नोटीस बोर्डवर लावतात. वर किंवा वधू या दोघांपैकी एक जण अन्य जिल्ह्यातील असल्यास त्या जिल्ह्याचे विवाह अधिकाºयांकडे नाटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठविली जाते. विशेष विवाह नोंदणीकरीता वर-वधू यांना विवाह अधिकाºयांकडे नोटीस देणे, ३० दिवसानंतर विवाह संपन्न करणे, या दोन कामासाठी जावे लागते. यापैकी नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस दिल्यानंतर ३० दिवसाच्या आत नियोजित विवाहाबद्दल आक्षेप न आल्यास, त्यानंतरच्या ६० दिवसात वर-वधू, तीन साक्षीदारांसह विवाह अधिकाºयांसमोर उपस्थित राहतात. विवाह अधिकारी त्यांचा विवाह संपन्न करून विवाह प्रमाणपत्र देतात. विवाह अधिकाºयांकडे नोटीस दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत नियोजित विवाहाबद्दल आक्षेप न आल्यास त्यानंतर ६० दिवसात वर-वधु तीन साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाºयांसमोर उपस्थित राहतात. विवाह अधिकारी त्यांचा विवाह संपन्न करून विवाह प्रमाणपत्र देतात. आता नोटीस आॅनलाईन झाल्यामुळे कार्यालयात समक्ष येण्याची गरज नाही. विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विवाह नोंदणी प्रणालीचे सुद्धा संगणकीकरण केले आहे. राज्यातील सर्व विवाह अधिकाºयांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरला जोडण्यात आली आहे.