कुलरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 20:16 IST2021-07-17T20:15:48+5:302021-07-17T20:16:01+5:30
Married woman dies of cooler shock : सपना संदिप बाठे (२४ ) असे मृतक महिलेचे नाव आहे.

कुलरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू
नांदुरा: कुलरचा शॉक लागून विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील धाडी येथे शनिवारी सकाळी घडली. सपना संदिप बाठे (२४ ) असे मृतक महिलेचे नाव आहे.
शनिवारी सकाळी सहा वाजता सपना ही कुलर जवळ निपचित पडलेली आढळली. पतीने आरडाओरडा केला असता अनंत राजाराम बाठे हे मदतीसाठी धावून गेले. त्यांनी तत्काळ महिलेला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या विवाहित महिलेला दोन वर्षाचा मुलगा असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.