बुलढाणा : विवाहित महिला दोन दिवसांपासून बेपत्ता
By ब्रह्मानंद जाधव | Published: May 5, 2023 05:58 PM2023-05-05T17:58:00+5:302023-05-05T17:58:09+5:30
येथील ३० वर्षीय विवाहित महिला दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
मलकापूर पांगरा : येथील ३० वर्षीय विवाहित महिला दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात साखरखेर्डा पोलिसांनी ५ मे रोजी महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली असून, पोलिस तपास सुरू आहे.
शिल्पा सुरेश काकडे (वय ३०) या ३ मे रोजी रात्री १ वाजेनंतर घर सोडून निघून गेल्या. रंग काळा सावळा, उंची साडेचार फूट, अंगात निळ्या व लाल रंगाची साडी आहे. या संदर्भात सुरेश फकिरा काकडे (वय ३६) यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिल्पा काकडे या ३ मे रोजी रात्री १ वाजेपर्यंत घरी होत्या, परंतु सकाळी सुरेश काकडे यांना शिल्पा घरात कुठेही आढळून आल्या नाहीत. दरम्यान, नातेवाइकांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली असता, त्या सापडल्या नाही. अखेर साखरखेर्डा पोलिस स्टेशनला ५ मे रोजी महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जामदार निवृत्ती पोफळे हे करीत आहेत.